मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur : ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांचा एकाच हॉटेलमध्ये मुक्काम; नागपुरात शिवसेना एकत्र येणार?

Nagpur : ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांचा एकाच हॉटेलमध्ये मुक्काम; नागपुरात शिवसेना एकत्र येणार?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 20, 2022 08:52 AM IST

Thackeray vs Shinde Group In Assembly Winter Session : हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार एकाच हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

Maharashtra Assembly Winter Session Live Updates
Maharashtra Assembly Winter Session Live Updates (HT)

Maharashtra Assembly Winter Session Live Updates : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला कालपासून नागपुरात सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच हिवाळी अधिवेशन असल्यानं त्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालं आहे. अधिवेशनात सहभागी होण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील नागपुरात दाखल झाले आहेत. त्यामुळं आज विधानसभेत ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. परंतु नागपुरात अधिवेशनासाठी गेलेले शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार एकाच हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेचं कामकाज संपल्यानंतर दोन्ही गटाचे आमदार मुक्कामासाठी रेडिसन ब्ल्यू हॉटेलच्या दिशेनं रवाना झाले. यावेळी दोन्ही गटाचे आमदार

रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्येच थांबले असल्याची माहिती समोर आली. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा देत मनोमिलनाचे संकेत दिले. ठाकरे गटाचे आमदार आणि आमचे आमदार नागपुरातील एकाच हॉटेलमध्ये थांबणार आहेत. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे याच हॉटेलमध्ये थांबतील, याची माहिती आम्हाला नव्हती. त्यामुळं आता आम्ही त्यांना भेटणार नाही. भेटायचं असेल तर त्यांनी आमच्याकडे येऊन भेटावं. दोन्ही गटाच्या आमदारांनी एकाच हॉटेलमध्ये थांबणं हे केवळ योगायोग असल्याचंही शिंदे गटाचे आमदार भारत गोगावले म्हणाले.

शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभेत आज आमने-सामने येण्याची शक्यता आहे. याशिवाय महापुरुषांचा अपमान आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरे शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPL_Entry_Point