मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Winter Session : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर देवेंद्र फडणवीसांची थेट भूमिका, म्हणाले...

Winter Session : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर देवेंद्र फडणवीसांची थेट भूमिका, म्हणाले...

Dec 19, 2022 07:56 PM IST Atik Sikandar Shaikh
Dec 19, 2022 07:56 PM IST
  • Maharashtra Assembly Winter Session In Nagpur : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावादावरून पुन्हा राजकारण पेटलं आहे. कर्नाटक सरकारनं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याची परवानगी रद्द करत बेळगावात जमावबंदी लागू केली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात प्रवेशबंदी जारी केली आहे. त्यामुळं या सर्व प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारची भूमिका विधानसभेत मांडली आहे. राज्य सरकार सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभं आहे. कर्नाटक सरकारनं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्या पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे, त्यांना सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत बोलताना दिली आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp