MVA Protest Against Karnataka Govt On Kognoli Toll Plaza : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी नाकारत कर्नाटक सरकारनं बेळगावात जमावबंदी लागू केली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते हसन मुश्रीफ आणि संजय पवार यांना पोलिसांनी कोनगोळी टोलनाक्यावर अडवलं. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मविआच्या नेत्यांनी कोनगोळी टोलनाका परिसरात ठिय्या आंदोलन केलं आहे. यावेळी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.