मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar: शिंदे आणि ठाकरेंना अजित पवार यांनी दिला सल्ला; म्हणाले, शब्द जपून वापरा

Ajit Pawar: शिंदे आणि ठाकरेंना अजित पवार यांनी दिला सल्ला; म्हणाले, शब्द जपून वापरा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 05, 2022 02:18 PM IST

Ajit Pawar On Dasara Melava: ठाकरे आणि शिंदे यांच्या दसरा मेळाव्याबाबत बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दोघांनाही एक सल्ला दिला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (फोटो - पीटीआय)

मुंबईत आज शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होत आहेत. एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण होणार आहे. यात आतापर्यंत केलेल्या आरोपांसह नव्याने एकमेकांवर टीका केली जाईल. या दोन्ही मेळाव्यातील भाषणाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आता या मेळाव्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दोन्हीही नेत्यांना एक सल्ला दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अजित पवार यांनी म्हटलं की, "दसऱ्याच्या दिवशी दोघांनीही समंजस अशी भूमिका घ्यावी. त्यांनी आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न दरूर करावा. आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पक्षाची भूमिका जनतेसमोर ठेवायचा अधिकारही आहे. मात्र कुणाबद्दल अनादराची भावना न दाखवता, महाराष्ट्राची परंपरा आहे तिला कुठे बाधा येणार नाही, डाग लागणार नाही, कमीपणा येणार नाही याची काळजी घ्यावी. शब्द जपून वापरावेत, कटुता वाढणार नाही अशा प्रकारे प्रत्येकाने वागावं."

वाद पराकोटीला गेले आहेत. त्यात आता कुणी पुढाकार घ्यायचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शब्दाने शब्द वाढतो, एकाने अरे म्हटलं की पुढच्याने कारे म्हणायचं, यातून ते इतकं खाली जातं की खालच्या लोकांनाही वाटतं आपण एकमेकांचे शत्रू झालो. पण हे असं नाही, तेवढ्यापुरत्या आपल्या भूमिका सांगण्याचं काम प्रत्येकाने करावे. मात्र एकदा राजकीय जोडे बाजूला ठेवले की त्यानंतर सलोख्याच्या भावनेतून बघावं असंही अजित पवार म्हणाले.

ठाकरे आणि शिंदे यांच्यातील कटुता कमी होईल असंही अजित पवार यांनी म्हटलं. शेवटी प्रत्येकाची भूमिका काय आहे आणि उद्दिष्ट काय आहे हेसुद्धा महत्त्वाचं असतं. कोणतीही गोष्ट फार काळ टोकाची राहत नाही. दिवस जसजसे पुढे जातील तशी कटुता कमी होईल असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या