
पुणे : पुणे विद्यापीठात अश्लील आणि शिवराळ भाषेत रॅप सॉन्ग चित्रित केल्याचा वाद शमतांना दिसत नाही. आधी राष्ट्रवादी कॉँग्रेसने या गण्या विरोधात आक्रमक भूमिका घेत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले होते. आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या विरोधात पुणे विद्यापीठात आंदोलन करत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आंदोलकांनी तोडफोड केली. या प्रकरणी आंदोलकांनी विद्यापीठ प्रशासनाला जाब देखील विचारलं आहे.
पुणे विद्यापीठात विनापरवानगी रॅपर शुभम जाधव याने रॅप सॉंग गायले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हे शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे विद्यापीठात या अश्लील आणि शिवराळ भाषेत असलेल्या गाण्याला कुणी परवानगी दिली याबद्दल जाब विचारत दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाला जंग लयावर या बाबत परवानगी कुणी दिली तसेच हे गाणे आवारात कसे शूट झाले या संदर्भात तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती देखील नेमली होती. तसेच या प्रकरणी शुभम जाधववर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देखील आक्रमक भूमिका घेत विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आंदोनल केले. यावेळी आक्रमक आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जात विद्यापीठ प्रशासनाविरोधात घोषणा देत सभागृहात तोडफोड केली. यावेळी आक्रमक आंदोलकांनी विद्यापीठ प्रशासनाला धारवेर धरत जाब विचारला. तसेच पुणे विद्यापीठाच्या प्रलंबित प्रश्नांवर देखील जाब विचारण्यात आला.
दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत आणि ज्या ठिकाणी विद्यापीठाची अधिसभा भरते तिथे अश्लील भाषेतील रॅप गाण्याचे शूटिंग करण्यात आले होते. ज्या खुर्चीवर कुलगुरु बसतात त्या खुर्चीवर बसून आणि समोरच्या टेबलवर दारुची बाटली ठेवून शुभम जाधव नावाच्या रॅपरने हे रॅप सॉंग शुट केलं होते. हे गाणे शूट करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनातील व्यक्तींकडून मदत करण्यात आल्याची माहिती मिळत असून ही परवानगी देणाऱ्या विद्यापीठाच्या बड्या अधिकाऱ्याची चौकशी ही समिती करणार आहे.
रॅप सॉन्ग शुटींगला विद्यापीठ प्रशासनाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी तोंडी परवानगी दिल्याचा दावा रॅपर शुभमने केला आहे. त्याने यूट्यूब वरुन गाणे काढले असून माफी मागीतली आहे. दरम्यान, हे प्रकरण मिटवण्यात यावे असे आवाहन त्याने केले आहे. त्याचे या प्रकरणी आर्थिक नुकसान होत असल्याचे त्याने म्हटले आहे.
संबंधित बातम्या
