मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : फेसबुकवरील ओळख पडली महागात; विवाहितेवर मित्राकडून बलात्कार

Pune Crime : फेसबुकवरील ओळख पडली महागात; विवाहितेवर मित्राकडून बलात्कार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 30, 2022 06:07 PM IST

Pune rape : फेसबुकवर मैत्री झालेल्या एका तरुणाने २६ वर्षीय विवाहितेला एका लॉजवर भेटण्यासाठी बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Pune crime
Pune crime (HT_PRINT)

पुणे : फेसबुकवर मैत्री झालेल्या एका तरुणाने २६ वर्षीय विवाहितेला एका लॉजवर भेटण्यासाठी बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून त्यावरून वेळो-वेळी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी संबंधित पिडितेनेथेट पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. अखेर पोलीसांनी याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अतुल इंदलकर (वय २५, रा.हडपसर,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात २६ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. ही घटना जानेवारी २०२२ ते नोव्हेंबर २०२२ यादरम्यान घडली. पोलीसांनी दिलेल्या महितीनुसार, या महिलेचीफेसबुकवरुन आरोपीशी ओळख झाली. अतुल इंदलकर याने या महिलेस हांडेवाडी येथे एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचे अर्धनग्न फोटो काढून ते पतीला व नातेवाईकांना दाखविण्याची धमकी दिली. तिला वारंवार भेटण्यास बोलावूनजबरदस्तीने शारिरिक संबंध प्रस्थापित करुन तिला मारहाण केली. अखेर या त्रासाला कंटाळून तिने पोलिसांत धाव घेतल्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा छळ

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीची तिच्या मैत्रिणीमुळे एका तरुणाशी चार वर्षापूर्वी ओळख झाली. त्यानंतर ही तरुणी वारंवार कॉलेजला बसने जात असताना बस मधुन तसेच दुचाकीवरुन तिचा पाठलाग करुन , बसमध्ये तिच्या शेजारी बसून तिला वाईट हेतूने स्पर्श करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य तरुणाने केले. २७ नोव्हेंबर रोजी ती दुध आणण्याकरिता जात असताना आरोपीने तिला थांबवुन, तु मला खुप आवडतेस, माझ्या बरोबर लग्न कर असे म्हणून तिच्या घरी जाऊन तिच्या वडीलांना व तरुणीस धमकी देवून दमदाटी केली. या प्रकरणी गणेश खडके (रा,पुणे) या गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग