मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Hadapsar Crime : लग्नकार्यातील शिल्लक गुलाबजाम घरी नेण्यावरून कार्यमालकाचे नातलग व केटरर्स चालकात तुंबळ हाणामारी

Pune Hadapsar Crime : लग्नकार्यातील शिल्लक गुलाबजाम घरी नेण्यावरून कार्यमालकाचे नातलग व केटरर्स चालकात तुंबळ हाणामारी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 26, 2023 12:17 PM IST

Pune Hadapsar crime : पुण्यात हडपसर येथील शेवाळवाडी येथे एका लग्नकार्यात गुलाबजाम घरी नेन्यावरून नातेवाईक आणि केटरर्स चालकात तूफान हाणामारी झाली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hadapsar crime news
Hadapsar crime news

पुण्यात : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. पुण्यात देखील विवाहसाठी अनेक मंगल कार्यालय लग्नासाठी फुल्ल आहेत. दरम्यान, अशाच एका लग्नसोहळ्यात शिल्लक राहलेले गुलाबजाम घरी नेण्याच्या कारणावरून नातेवाईक आणि केटरर्सचालकात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना हडपसर येथील शेवाळेवाडी ग्रामपंचायतीतील राजयोग मंगल कार्यालयात रविवारी घडली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा मार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात; १ ठार, २२ प्रवासी जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब ग्रील हॉटेल येथे गुप्ता हा व्यवस्थापक म्हणून काम करतो. त्याचे मालक कमलदिपसिंग यांनी शेवाळवाडी येथील राजयोग मंगल कार्यालय चालविण्यास घेतले आहे. रविवारी तेथे लोखंडे आणि कांबळे परिवाराचा विवाह होता. हा हॉल संजय लोखंडे यांनी बूक केला होता. जेवणाच्या व्यवस्थेचे काम फिर्यादी गुप्ता यांच्याकडे होते.

Nashik Raid: नाशिकच्या बिल्डरांचे बेहिशेबी घबाड उघड; आयकरच्या छाप्यात ३,३३३ कोटींचा मुद्देमाल जप्त

दिड वाजता लग्न पार पाडल्यावर सर्व पाहुण्यांचे जेवण झाले. यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास वर पक्षाकडील एक व्यक्ती किचनमध्ये आली, तेव्हा त्याने राहिलेले जेवण सोबत घेऊन जायचे असल्याचे सांगितले. गुप्ता यांनी काही हरकत नसल्याचे सांगितल्यावर त्या व्यक्ती सोबत आलेली दोन माणसे राहिलेले सर्व जेवण भरत होते. दरम्यान, त्या ठिकाणी असलेले गुलाबजाम देखील वर पक्षाकडील तो एक व्यक्ती डब्यात भरू लागला. दरम्यान, गुप्ता यांनी हा प्रकार पाहिल्यावर त्या व्यक्तीला त्यांनी हटकले.

ते गूलाबजाम हे उद्याच्या लग्नाच्या जेवणासाठी तयार केलेले आहेत, ते तुमचे नाहीत, ते घेऊ नका गुप्ता याने सांगितले. दरम्यान, याचा राग येऊन तीघांनी गुप्ता याला मारहाण केली तर त्यातील एकाने लोखंडी झारा गुप्ता याच्या डोक्यात मारून जखमी केले. यानंतर गुप्ता यांचे मालक आल्यावर आरोपी तेथून पळून गेले. या घटनेनंतर गुप्ता यांनी हडपसर पोलिस ठाणे गाठत आरोपींवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी देखील याची दखल घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग