Nashik Raid: नाशिकच्या बिल्डरांचे बेहिशेबी घबाड उघड; आयकरच्या छाप्यात ३,३३३ कोटींचा मुद्देमाल जप्त
Nashik Income Tax Raid: नाशिक येथे दोन दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या पथकाने बिल्डरांच्या बेहिशेबी संपत्तीवर छापेमारी केली होती. यात तब्बल ३ हजार ३३३ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यात आली.
नाशिक : नाशिक येथे जवळपास २० ते २५ बिल्डरांवर आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी छापे घातले होते. नाशिक सह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर कार्यालयात देखील छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईत तब्बल ३ हजार ३३३ कोटींची बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार आयकर विभागाने उघडकीस आणले. तसेच साडेपाच कोटींची रोख रक्कम आणि काही दागिनेही जप्त करण्यात आले. राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
ट्रेंडिंग न्यूज
Amit Shah : पडद्यामागे काहीतरी घडतंय?; अमित शहा १५ दिवसांत दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर, चर्चांना उधाण
आयकर विभागाने मंगळवारी नाशिकच्या बड्या बिल्डरांवर ही कारवाई केली. ५० हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून आलेल्या या पथकांनी ४० ते ४५ कार्यालये, बंगले, फार्म हाऊसवर वर छापे टाकले. या छापेमरीत एका बड्या लॉटरी व्यावसायिकाकडे ७० ते ८० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे.
नाशिकसह मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथी देखील आयकर विभागाने धाडी टाकल्या तब्बल २२५ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. बुधवारी (दि १९) शिर्डी येथे कारवाई करण्यात आली. अतिशय गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली. वेगवेगळ्या वाहनातून दाखल होत पहाटे ६ पासून ही कारवाई करण्यात येत होती. या कारवाईत आयकर विभागाच्या हाती तब्बल ३ हजार ३३३ कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती लागली आहे.