मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा मार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात; १ ठार, २२ प्रवासी जखमी

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा मार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात; १ ठार, २२ प्रवासी जखमी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 26, 2023 11:19 AM IST

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा मार्गावर कर्नाळा खिंडीत शिवशाही बसचा भीषण अपघात झाला असून ही बस पलटली. यात १ ठार तर २२ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Two Wheeler Accident Kandhar Nanded
Two Wheeler Accident Kandhar Nanded (HT)

मुंबई : मुंबई-गोवा मार्गावर आज शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसवरील चलकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस दुभाजकाला धडकुन पलटली. यात १ जण ठार झाला तर २२ प्रवाशी हे जखमी झाले. हा अपघात कर्नाळा खिंडीत एका अवघड वळणावर घडला.

ट्रेंडिंग न्यूज

Nashik Raid: नाशिकच्या बिल्डरांचे बेहिशेबी घबाड उघड; आयकरच्या छाप्यात ३,३३३ कोटींचा मुद्देमाल जप्त

दिप्तेश मोरेश्वर टेमघर (३१, रा. अष्टमी, ता. रोहा) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचं नाव आहे. या मिळालेल्या माहितीनुसार ही बस मुंबई-गोवा मार्गाने जात होती. ही बस भरधाव वेगात होती. बसमध्ये तब्बल ३८ प्रवासी आणि चालक व वाहक मिळून ४० जण प्रवास करत होते. ही बस पनवेलहून महाडकडे जा होती. दरम्यान, ही बस कर्नाळा खिंडीत आल्यानंतर बसवरील चलकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली.

Amit Shah : पडद्यामागे काहीतरी घडतंय?; अमित शहा १५ दिवसांत दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर, चर्चांना उधाण

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशी कल्पेश ठाकूर यांनी तातडीने अपघातग्रस्तांच्या मदत केली. त्यांनी जखमींना दोन रुग्णवाहिकांमधून पनवेल उपजिल्हा रुग्णालय दाखल केले तर काही प्रवाशांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले.

यातील काही प्रवाशांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे समजले. या अपघातानंतर या मार्गावर काही काल वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी येत तातडीने बस बाजूला करत येथीलव वाहतूक सुरुळीत केली.

IPL_Entry_Point

विभाग