मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: तुमच्या सौंदर्यात आणखी भर पाडतील हे फेस योगा, जॉलाइनही होईल परफेक्ट

Yoga Mantra: तुमच्या सौंदर्यात आणखी भर पाडतील हे फेस योगा, जॉलाइनही होईल परफेक्ट

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 28, 2023 08:12 AM IST

Benefits of Face Yoga: फेस योगा आपल्या चेहऱ्यावरील अकाली पडणाऱ्या सुरकुत्या कमी करून परफेक्ट जॉलाइन मिळवण्यास मदत करते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे याने आपला लूक सुधारतो.

फेस योगा
फेस योगा

Face Yoga to Prevent Premature Ageing and Get Toned Jawlines: बहुतांश लोक आपला लूक वाढवण्यासाठी टोन्ड जॉलाइनचे स्वप्न पाहतात. जर तुम्हालाही अशी इच्छा असेल तर फेस योगा तुम्हाला मदत करू शकतो. होय, फेस योगा आपल्या चेहऱ्यावरील अकाली सुरकुत्या कमी करून परिपूर्ण जॉलाइन मिळविण्यात मदत करते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपला लूक वाढविण्यासाठी आपल्याला एक पैसाही खर्च करण्याची आवश्यकता नाही. जाणून घेऊया कसे.

ट्रेंडिंग न्यूज

फेस योगाचे फायदे

- फेस योगा केल्याने चेहऱ्याचे रक्ताभिसरण चांगले राहते, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.

- फेस योगा केल्याने चेहऱ्यावर अकाली दिसणाऱ्या बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

- योगामुळे चेहऱ्याचे स्नायू बळकट होण्यास मदत होते.

- फेस योगासनामुळे तणाव कमी होऊन मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.

- दररोज फेस योगा केल्याने चेहऱ्यावरील सूज आणि डोळ्यांखालील वर्तुळे कमी होण्यास मदत होते.

- योगामुळे तुमचा चेहरा चमकदार होतो आणि त्वचा घट्ट होते.

चेहऱ्याच्या टोन्ड आणि परफेक्ट जॉलाइनसाठी रोज करा हे फेस योगा-

फिश फेस (Fish Face)

फिश फेस योगा करण्यासाठी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरून फिश फेस बनवण्याचा प्रयत्न करावा लागतो. यासाठी आपले ओठ आणि गाल आत खेचताना हे एक्सप्रेशन थोडा वेळ धरून ठेवा. हे करत असताना कमीत कमी ३० सेकंद हसण्याचा प्रयत्न करा. हा योग दिवसातून ३ ते ५ वेळा करावा.

छताला किस करण्याचा प्रयत्न करा (Kissing The Ceiling)

हा योग करण्यासाठी, सर्वात आधी आरामदायी स्थितीत बसताना किंवा उभे असताना तुमची पाठ सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. यानंतर, तुमचे डोके छताकडे वाकवा आणि तुमचे ओठ धरून ठेवा जसे की तुम्ही छताला चुंबन घेण्याचा प्रयत्न करत आहात. योगाच्या या आसनात सुमारे पाच सेकंद स्वत:ला थांबवा आणि हे चक्र पुन्हा एकदा करा.

सिंहाची मुद्रा (Lion Pose)

सिंहाची मुद्रा करताना, सर्वप्रथम आपले तोंड आणि डोळे उघडा. यानंतर, हनुवटी छातीजवळ आणताना, सिंहाचा आवाज काढताना जीभ बाहेर काढा. हे करत असताना तुम्ही तोंड बंद करून श्वास घेऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग