मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: मनाला आराम देऊन डिप्रेशन दूर करते मकरासन, ही आहे करण्याची योग्य पद्धत

Yoga Mantra: मनाला आराम देऊन डिप्रेशन दूर करते मकरासन, ही आहे करण्याची योग्य पद्धत

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 04, 2023 07:03 PM IST

Makarasana: धकाधकीच्या जीवनात रिलॅक्स होण्यासाठी तसेच मनावरील ताण कमी करण्यासाठी योगासन हे एक चांगले माध्यम आहे.

मकरासन
मकरासन

Health Benefits of Makarasana: आज प्रत्येक दुसरी व्यक्ती तणाव आणि नैराश्याच्या समस्येने त्रस्त आहे. त्यातून आराम मिळण्यासाठी तो कधी ध्यान तर कधी औषधांचा आधार घेतो. पण तुम्हाला माहीत आहे का की औषधांशिवायही तुम्ही दिवसभराचा थकवा आणि तणाव दूर करू शकता. होय, आणि मकरासन तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. मकरासनाला इंग्रजीत क्रोकोडाइल पोझ (Crocodile pose) असेही म्हणतात. मकरासन करताना माणूस जमिनीवर पोटावर मगरीसारखा झोपतो. हे आसन करताना दोन्ही हात उशीसारखे डोक्याजवळ ठेवावे लागतात. या अवस्थेत मन शांत ठेवून शरीराचे अवयव शिथिल करावे लागतात. या आसनाच्या नियमित सरावाने व्यक्तीचे मन शांत होते आणि त्याला अस्वस्थता, नैराश्य, मायग्रेन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

ट्रेंडिंग न्यूज

मकरसन करण्याची योग्य पद्धत

मकरासन करण्यासाठी सर्वप्रथम पोटावर झोपताना उजवा पाय वाकवून सरळ दिशेने ४५ अंशांचा कोन करा. हे करताना, तुमचा डावा पाय सरळ स्थितीत असावा हे लक्षात ठेवा. ते करताना, तुमचा डावा गाल चटईजवळ ठेवा. आपला उजवा हात डाव्या गालाजवळ घ्या. या स्थितीत सुमारे १५ मिनिटे झोपा, दीर्घ आणि लांब श्वास घ्या.

मकरासन करण्याचे फायदे

- मकरासन केल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो. या आसनाच्या नियमित सरावाने उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, टाइप २ मधुमेह आणि दमा यापासून आराम मिळू शकतो.

- मकरासन नियमित केल्याने माणसाची पचनक्रिया सुधारते.

हे आसन केल्याने शरीराचा थकवा आणि अंगदुखी दूर होण्यास आराम मिळतो.

- पोटाच्या स्नायूंना टोनिंग करण्यासोबतच मकरासन बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

- हे आसन केल्याने मानेतील ताठरपणासारख्या समस्या दूर होण्यासही मदत होते.

- मकरासनाचा सराव केल्यास उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मानसिक आजार या समस्या टाळता येतात.

- पाय दुखण्याची समस्या असेल तर हा योग केल्याने या समस्येपासूनही सुटका मिळते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग