मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss Tips: ब्रेकफास्ट नाही तर डिनरमध्ये खा हे फूड, वजन होईल झपाट्याने कमी

Weight Loss Tips: ब्रेकफास्ट नाही तर डिनरमध्ये खा हे फूड, वजन होईल झपाट्याने कमी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 21, 2023 11:04 AM IST

Healthy Diet Tips: वजन कमी करण्यासाठी बरेच लोक स्ट्रिक्ट डायट फॉलो करतात आणि डिनर स्किप करतात. त्यामुळे आवश्यक पोषणाचा अभाव होतो. हे पदार्थ तुम्ही रात्रीच्या जेवणात घेतले तर तुम्हाला पोषणही मिळेल आणि वजन सुद्धा कमी होईल.

वजन कमी करण्यासाठी डिनरमध्ये घ्या हे पदार्थ
वजन कमी करण्यासाठी डिनरमध्ये घ्या हे पदार्थ

Food for Weight Loss: वाढलेले वजन आरोग्यास हानी पोहोचवते. तसेच तुमच्या पर्सनॅलिटीवर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो. चरबी कमी करण्यासाठी लोक भरपूर व्यायामासह डायटचे खूप गांभीर्याने पालन करतात. तर काही लोक तर रात्रीचे जेवण देखील टाळतात. मात्र, अशा प्रकारे जेवण सोडल्याने शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता निर्माण होते. वजन नियंत्रित करण्यासाठी रात्रीचे जेवण स्किप करण्याऐवजी या पदार्थांचा समावेश करा.

ट्रेंडिंग न्यूज

डिनर स्किप करु नका

जर तुम्ही जास्त खाणे टाळण्यासाठी स्ट्रिक्ट हायट फॉलो करत असाल आणि रात्रीचे जेवण घेत नसाल तर रात्रीचे जेवण स्किप करुन का. वजन कंट्रोल करण्यासाठी रात्रीचे जेवण वगळण्याऐवजी हलके अन्न खा, जे सहज पचते. हे तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषण देईल.

डाळीचे सूप

तुम्ही रात्रीच्या जेवणात डाळीचे सूप घेऊ शकता. रात्रीच्या वेळी ते खूप हलके असेल आणि आवश्यक पोषण देखील देईल. ते बनवण्यासाठी डाळ भिजवा. कुकरमध्ये कांदा, जिरे टाका आणि सोबत टोमॅटो घाला. शेवटी भिजवलेली डाळ घाला, पाणी टाका आणि शिजवा. रात्रीच्या जेवणासाठी स्वादिष्ट डाळीचे सूप तयार आहे.

मिक्स्ड व्हेजिटेबल खिचडी

भरपूर भाज्या असलेली खिचडी रात्रीच्या जेवणासाठी योग्य आहे. याने तुम्हाला सर्व पोषक तत्वे नक्कीच मिळतील आणि पोटही हलके होईल. ब्रोकोली, गाजर, पालक आणि हव्या त्या आरोग्यदायी भाज्या घाला आणि सोबत थोडा भात शिजवा. ही खिचडी डायट फॉलो करणाऱ्यांसाठी आरोग्यदायी पर्याय आहे.

ओट्सपासून बनवा दलिया

ओट्स बहुतेक सकाळच्या नाश्त्यामध्ये खाल्ले जातात. पण तुम्ही ते रात्रीच्या जेवणातही खाऊ शकता. ओट्स आणि मूग डाळ एकत्र शिजवा आणि तडका द्या. हे डिनर वजन कमी करण्यासाठी योग्य आहे.

उपमा

तुम्ही नाश्त्यात रवा उपमा अनेकदा खाल्ला असेल. रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही क्विनोआ किंवा ओट्सचा उपमा बनवू शकता. क्विनोआ हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. जे रात्रीच्या जेवणात भाज्यांमध्ये मिसळून घेता येतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग