मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  मेटाबॉलिज्ममुळे वाढू शकते वजन, फक्त ग्रीन टी नाही तर या गोष्टी सुद्धा करतील मदत

मेटाबॉलिज्ममुळे वाढू शकते वजन, फक्त ग्रीन टी नाही तर या गोष्टी सुद्धा करतील मदत

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 20, 2023 07:03 PM IST

Weight Loss Tips: जर वजन वाढत असेल तर ते खराब मेटाबॉलिज्म सिस्टिममुळे देखील होते. यावर उपाय म्हणून फक्त ग्रीन टीच नाही तर या ड्रिंक्स आणि डायटचा अवलंब करायला हवा. जेणेकरून चयापचय वेगवान होईल.

मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी टिप्स
मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी टिप्स (unsplash)

How to Boost Metabolism: वयानुसार महिलांमध्ये वजन वाढणे सामान्य आहे. अनेक वेळा आहाराची काळजी घेऊनही कंबरेचा आकार वाढतो. अशा परिस्थितीत मेटाबॉलिज्म सिस्टीम वजन वाढण्याचे कारण तर नाही ना, हे जाणून घेणे आवश्यक आहे. ज्याचे मुख्य काम अन्न पचनाचा वेग बरोबर ठेवणे हे असते. तसं तर स्लो मेटाबॉलिज्म सिस्टीम लठ्ठपणा वाढण्याचे कारण असू शकते. वास्तविक स्लो मेटाबॉलिज्म प्रणालीमुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही आणि भूक लागत नाही. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. वजन कमी करण्यासाठी ते योग्य ठेवणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या सोप्या उपायांनी चयापचय प्रणाली बरी होऊ शकते.

ट्रेंडिंग न्यूज

दालचिनीचा चहा

दालचिनीचा चहा प्यायल्याने चयापचय प्रणाली लवकर बरी होते. दालचिनीमध्ये अँटी ऑक्सिडंट असतात, जे अन्न पचण्यास मदत करतात. यासोबतच हे वजन कमी करण्यास आणि फॅटच्या पचनासही मदत करते. सकाळी सर्वात आधी दालचिनीचा चहा प्यायल्यास चयापचय क्रिया व्यवस्थित होते आणि वजन सहज कमी होते.

ग्रीन टी

चयापचय प्रणाली बरे करण्यासाठी ग्रीन टी खूप प्रभावी मानली जाते. हे प्यायल्याने पोटाची चरबी कमी होते आणि वजन कमी होते. दिवसातून दोन कप ग्रीन टी चयापचय प्रणाली सुधारण्यास मदत करते.

देसी तूप

देसी तुपाचे नाव ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल पण यामुळे बद्धकोष्ठता तर कमी होतेच पण चयापचय प्रक्रियाही बरोबर राहते. देशी तुपाच्या गुळगुळीतपणामुळे आतड्यांमध्ये साचलेली घाण सहज निघण्यास मदत होते. त्यामुळे पोट स्वच्छ होते आणि चयापचय प्रक्रिया गतिमान होते.

आल्याचा चहा

आल्याचा चहा फक्त सर्दी आणि खोकला रोखण्यासाठीच नाही तर पोट फुगणे देखील थांबवते. त्यामुळे चयापचय प्रक्रिया जलद होते आणि अन्न लवकर पचते.

ओवा

तुमच्या जेवणात कोणत्या ना कोणत्या प्रकारे ओव्याचा जरुर समावेश केला पाहिजे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ओव्याचे पाणी सुद्धा पिऊ शकता. हे पचनसंस्थेला दुरुस्त करण्यास मदत करते.

आहार असावे योग्य

जर तुमचे आहार योग्य असेल तर पचनक्रियाही योग्य होते. भरपूर प्रथिने, फायबरने भरपूर, तृणधान्ये खाणे फायदेशीर आहे. त्याचबरोबर आहारात सफरचंद आणि संत्री यांचा समावेश करा. ते चयापचय प्रणाली गतिमान करतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग