मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  मर्यादित प्रमाणात खा 'हे' पदार्थ, अन्यथा किडनी खराब होण्याचा असतो धोका

मर्यादित प्रमाणात खा 'हे' पदार्थ, अन्यथा किडनी खराब होण्याचा असतो धोका

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 15, 2023 04:54 PM IST

Health Care: पोटॅशियमचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ कमी प्रमाणात खावेत. या ६ प्रकारच्या पदार्थांमुळे किडनी खराब होण्याचा धोका असतो.

पोटॅशियम समृद्ध पदार्थ
पोटॅशियम समृद्ध पदार्थ (unsplash)

Foods Can Damage Kidney: किडनी हा शरीराचा अत्यावश्यक भाग आहे. ते खाल्लेल्या पदार्थांमधील घाण गाळून टाकते. जो यूरिनद्वारे बाहेर पडतो. किडनी खराब झाल्यावर शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. त्याच वेळी, किडनी निकामी होण्याची सुद्धा भीती असते. जेवणात काही गोष्टी अशा असतात, ज्यांना पचवण्यासाठी आणि त्यातील पोषक द्रव्ये बाहेर काढण्यासाठी शरीराच्या अवयवांना खूप मेहनत करावी लागते. हिच समस्या किडनीसोबतही उद्भवते. जेव्हा आपण पोटॅशियमयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खातो तेव्हा किडनी योग्य प्रकारे शुद्ध करू शकत नाही आणि किडनी खराब होण्याचा धोका असतो.

किडनी नीट काम करत नसेल तर यूरिक अॅसिड, अमोनिया, युरिया, अमिनो अॅसिड आणि सोडियम यांसारखे पदार्थ शरीरात तयार होऊ लागतात आणि शरीरातून बाहेर पडू शकत नाहीत. अशा स्थितीत काही पदार्थ अतिशय काळजीपूर्वक सेवन करणे गरजेचे आहे.

केळी

केळीमध्ये पोटॅशियम भरपूर असते. जर तुम्ही आधीच किडनीच्या आजाराने त्रस्त असाल तर केळी कधीही खाऊ नका. यामुळे शरीरातील समस्या वाढतात.

साल असलेले बटाटे

आजकाल सालासोबत बटाट्याची भाज्या आणि चिप्स बनवण्याच्या रेसिपी अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. पण बटाटे कधीच सालींसोबत खाऊ नयेत. बटाट्यासोबतच त्याच्या सालीमध्ये भरपूर पोटॅशियम असते. जे खाल्ल्याने किडनी हळूहळू खराब होऊ लागते.

चिकन ब्रेस्ट

तसे मांसाहार अत्यंत मर्यादित प्रमाणात केला पाहिजे. चिकन ब्रेस्टमध्ये प्रथिने आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जर एखाद्याची किडनी कमकुवत असेल तर त्याने चिकन ब्रेस्ट अजिबात खाऊ नये. त्याच वेळी, निरोगी लोकांनी देखील कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे.

टोमॅटो

रोजच्या जेवणाच्या ताटात टोमॅटो भरपूर असेल तर त्याने नुकसान होऊ शकते. टोमॅटोमध्ये भरपूर पोटॅशियम असते. ज्यामुळे किडनी खराब होते.

डाळ

डाळींमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. प्रथिनांसह पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. डाळींचा आहारात समावेश करताना त्यासोबत इतर धान्ये खावीत आणि कडधान्ये जास्त प्रमाणात खाणे टाळावे.

दूध आणि दही

ज्यांना किडनीचा त्रास आहे अशा लोकांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अजिबात खाऊ नयेत. त्याच वेळी, दुग्धजन्य पदार्थ किडनीच्या कार्यावर देखील परिणाम करतात. म्हणूनच त्यांच्यापासून अंतर ठेवणे चांगले आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग