मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss: 'या' ४ गोष्टींमध्ये मिक्स करा मध, तुमची वेट लॉस जर्नी होईल अजून सोपी

Weight Loss: 'या' ४ गोष्टींमध्ये मिक्स करा मध, तुमची वेट लॉस जर्नी होईल अजून सोपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 30, 2023 02:22 PM IST

वेट लॉस डायटमध्ये लोक अनेकदा गोड पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहित आहे का की नैसर्गिक गोडव्याने भरलेले मध तुमच्या वेट लॉस जर्नीला गती देऊ शकतो.

वजन कमी करण्यासाठी या गोष्टींसोबत मध घ्या
वजन कमी करण्यासाठी या गोष्टींसोबत मध घ्या

Honey for Weight Loss: नेहमीच्या अशा अनेक सवयी आहेत ज्यामुळे वजन वाढण्याची समस्या वेगाने वाढत आहे. त्याच वेळी, वाढते वजन आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक असू शकते. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, मधुमेहापासून हृदयापर्यंतचे आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत, निरोगी वजन राखणे खूप महत्वाचे आहे. वेट लॉस डायटमध्ये लोक सर्व प्रथम गोड पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. मात्र यासोबतच टेस्ट बड्सची काळजी घेणेही आवश्यक आहे. कारण गोडाकडे जास्त काळ दुर्लक्ष करणे शक्य नाही. त्यामुळे क्रेविंग शांत करण्यासाठी मध हा एक चांगला पर्याय असेल. मध मध्ये असे अनेक आवश्यक पोषक घटक आहेत, जे तुमचे वजन राखण्यात मदत करू शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही वेट लॉस जर्नीवर असाल, तर तुम्ही या ४ मार्गांनी तुमच्या आहारात मधाचा समावेश करू शकता. चला तर मग जाणून घेऊया मध आपल्या आरोग्यासाठी कसे काम करते.

ट्रेंडिंग न्यूज

वजन कमी करण्यासाठी मध वापरण्याची योग्य पद्धत

१. दालचिनी आणि मध

पौष्टिकतेने समृद्ध दालचिनीचा वापर आरोग्याच्या अनेक समस्यांसाठी वर्षानुवर्षे केला जात आहे आणि या मसाल्याचा उपयोग विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी देखील केला जातो. मध आणि दालचिनीचे मिश्रण वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते. तुम्ही तुमच्या नेहमीच्या ग्रीन टीमध्ये दालचिनी आणि मध मिक्स करू शकता. यासोबतच अर्धा चमचा दालचिनी पावडर एक चमचा दालचिनीमध्ये मिसळून कोमट पाण्यासोबत घेणे देखील चांगले आहे. या दोन्ही सुपरफूडचे चयापचय गुणधर्म तुम्हाला दिवसभर उत्साही राहण्यास मदत करतात. त्याच वेळी, ते भूक देखील नियंत्रित करते, ज्यामुळे आपण आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरी वापरत नाही.

२. लिंबू आणि मध

रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास खूप मदत होते. ते तुमचे शरीर डिटॉक्स करते आणि दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवते. ज्यामुळे तुम्ही दिवसभर अधिक सक्रिय राहू शकता. दुसरीकडे तुम्ही ऑफिसला गेल्यास, तुमच्या पाण्याच्या बॉटलमध्ये मध आणि लिंबाचा रस मिसळून ठेवू शकता. दिवसभर याचे सेवन केल्याने तुमचे चयापचय वाढते आणि तुम्हाला फ्रेश राहण्यास मदत होते.

३. मध आणि लसूण

तुम्ही लसणाच्या २ ते ३ पाकळ्या ठेचून त्यात एक चमचा मध मिसळून रोज सकाळी सेवन करू शकता. हे तुमचे शरीर डिटॉक्स करते, तसेच तुमची पचनसंस्था मजबूत ठेवते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच तणाव कमी करण्यासाठी आणि रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवण्यासाठी देखील याचे सेवन खूप प्रभावी मानले जाते.

४. दूध आणि मध

दुधामध्ये प्रथिने पुरेशा प्रमाणात असते, जे चयापचय वाढवताना भूक नियंत्रणात ठेवते. यासोबतच हे पोटाची चरबी कमी करण्यात प्रभावी आहे आणि रक्तदाब सामान्य ठेवते. त्याचबरोबर त्यात मध मिसळून प्यायल्याने ही सर्व क्रिया अधिक प्रभावीपणे चालते. एक ग्लास कोमट दुधात मध मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात वेलची पावडर टाकू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग