मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: वेट लॉस ते ॲनिमिया, हे आहेत कढीपत्त्याचे आश्चर्यकारक फायदे!

Health Tips: वेट लॉस ते ॲनिमिया, हे आहेत कढीपत्त्याचे आश्चर्यकारक फायदे!

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 27, 2023 11:43 AM IST

Curry Leaves Benefits: आरोग्य तज्ञांच्या मते, कढीपत्ता ब्लड शुगरच्या समस्येवर खूप फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत रोज कढीपत्त्याचे सेवन केल्याने माणसाला कसे फायदे होतात ते जाणून घेऊया.

कढीपत्त्याचे फायदे
कढीपत्त्याचे फायदे (unsplash)

Health Benefits of Curry Leaves: आजपर्यंत तुम्ही कढीपत्त्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी किंवा केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी केला असेल. पण तुम्हाला माहित आहे का की रोज कढीपत्त्याचे सेवन केल्याने व्यक्ती केवळ लठ्ठपणापासून मुक्त होऊ शकत नाही तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर सहज मात करू शकतो. कढीपत्त्यात फायबर, लोह, तांबे, कॅल्शियम, फॉस्फरससह व्हिटॅमिन बी २, बी ६, बी ९ मुबलक प्रमाणात आढळतात. कढीपत्त्यात असलेले हे सर्व औषधी गुणधर्म माणसाला अनेक गंभीर आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कढीपत्ता रक्तातील साखरेच्या समस्येवर खूप फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत रोज कढीपत्त्याचे सेवन केल्याने माणसाला कसे फायदे होतात ते जाणून घेऊया.

आहारात कढीपत्त्याचा समावेश केल्याने होतात हे फायदे

केस गळणे थांबवते

दाट आणि लांब केसांसाठी शरीरात व्हिटॅमिन बी २, बी ६ आणि बी ९ आवश्यक असते आणि हे सर्व घटक कढीपत्त्यात मुबलक प्रमाणात आढळतात. सुंदर केस मिळविण्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर आणि पाणी पिल्यानंतर काही कढीपत्ता चावून खाऊ शकता. जर तुम्हाला पाने चघळायची नसतील तर कढीपत्त्याचे पाने उकळून ते पाणी गाळून १५-२० मिनिटे रोज मसाज करा.

वजन कमी करणे

कढीपत्ता तुम्हाला तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये मदत करू शकते. कढीपत्त्यात डायक्लोरोमेथेन, इथाइल एसीटेट आणि महानिम्बाइन सारखे घटक असतात, जे वजन कमी करण्यासोबत कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

ॲनिमिया दूर करते

कढीपत्ता ॲनिमिया दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. अँटी अ‍ॅनिमिया गुणधर्मां सोबतच त्यात कॅल्शियम, लोह आणि झिंकचे प्रमाण जास्त असते, जे ॲनिमियाशी लढण्यास मदत करते.

मधुमेहावर नियंत्रण ठेवते

मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांना कढीपत्ता खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यात अनेक अँटी डायबिटीज गुणधर्म असतात. एवढेच नाही तर यामध्ये असलेल्या फायबरचा इन्सुलिनवर सकारात्मक प्रभाव पडतो. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

त्वचेसाठी फायदेशीर

कढीपत्त्यात अनेक अँटी ऑक्सिडेंट, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासोबतच त्वचेचा कोरडेपणाही दूर होण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या