मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss Tips: रात्री झोपण्यापूर्वी रोज करा हे काम, जीममध्ये न जाता वजन होईल कमी

Weight Loss Tips: रात्री झोपण्यापूर्वी रोज करा हे काम, जीममध्ये न जाता वजन होईल कमी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 26, 2023 10:59 PM IST

जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या आहारात काही पेयांचा समावेश केला तर तुम्ही जिममध्ये पैसे व वेळ न घालवता बरेच वजन कमी करू शकता. येथे काही उत्तम ड्रिंक्स आहेत.

वजन कमी करण्यासाठी बेडटाइम ड्रिंक्स
वजन कमी करण्यासाठी बेडटाइम ड्रिंक्स (unsplash)

Simple Bedtime Drinks for Weighlt Loss: वजन कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत, जे वेगवेगळ्या शरीराच्या प्रकारांसोबत वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. चांगले पचन, झोप आणि वजन कमी करण्यासाठी झोपण्याच्या दोन तास आधी रात्रीचे जेवण घेण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच तुम्ही काही पेयांचा आहारात समावेश करू शकता जे वजन कमी करण्यास मदत करतात. हे पेय तुम्ही झोपण्यापूर्वी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.

चरबी बर्न करण्यासाठी बेडटाइम ड्रिंक्स

हळद-आले चहा

सर्दी, खोकला आणि जखमा बरे करण्याव्यतिरिक्त हळद चयापचय वाढवण्यास आणि पचन सुधारण्यास देखील मदत करते. त्यातील अँटि ऑक्सिडंट गुणधर्म आपल्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकतात. हळद आल्याचा चहा बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये १ कप पाणी चांगले उकळवा. नंतर किसलेली एक इंच लांब कच्ची हळद आणि आले घाला. थोडेसे उकळा आणि गरम गरम प्या.

कॅमोमाइल चहा

कॅमोमाइल चहा हे कॅफीन मुक्त पेय आहे. हे रक्तप्रवाहातून साखर काढून टाकण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यास मदत करते. हे तुम्हाला साखरेची लालसा आणि कॅलरीजच्या अति वापरापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे वजन वाढत नाही. यासाठी कॅमोमाइलची फुले एक कप गरम पाण्यात ५ ते १० मिनिटे भिजवून प्या. वजन कमी करण्याबरोबरच, कॅमोमाइल चांगली झोप वाढवू शकते.

दालचिनी चहा

दालचिनी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, यामुळेच भारतीय स्वयंपाकघरात याचा भरपूर वापर केला जातो. मधासोबत दालचिनी तुम्हाला काही किलो वजन कमी करण्यास मदत करते. उकळत्या पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर मिक्स करा. ते गाळून घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळून दालचिनीचा चहा तयार करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग