मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Healthy Habits: फक्त टोमॅटोच नाही तर या ५ गोष्टी चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका, होईल नुकसान

Healthy Habits: फक्त टोमॅटोच नाही तर या ५ गोष्टी चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका, होईल नुकसान

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 27, 2023 02:47 PM IST

Health Tips: तुम्हाला माहित आहेका की खाण्या-पिण्याच्या अनेक गोष्टी अशा आहेत की त्या फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांच्या फक्त चवीतच फरक पडत नाही तर आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. या कोणत्या गोष्टी आहेत, जाणून घ्या.

फ्रिजमध्ये या गोष्टी ठेवू नये
फ्रिजमध्ये या गोष्टी ठेवू नये

Foods That Should Not Kept In Fridge: बरेचदा लोक फळे आणि भाज्या जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतात. पण तुम्हाला माहित आहे का की फ्रिजमध्ये ठेवलेल्या अनेक खाद्यपदार्थ त्यांच्या चवीत तर फरक पडतोच, पण ते आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते. अशा परिस्थितीत फ्रिजमध्ये कोणत्या गोष्टी ठेवायचे टाळल्या पाहिजेत हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

टोमॅटो

महिला अनेकदा बाजारातून टोमॅटो विकत घेतात आणि फ्रिजमध्ये ठेवतात. पण टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवू नयेत. फ्रिजच्या थंड हवमुळे टोमॅटोच्या आतील पडदा तुटते, ज्यामुळे ते मऊ होते आणि लवकर सडते आणि त्याची चव देखील खराब होऊ शकते. टोमॅटो नेहमी फ्रीजच्या बाहेर ठेवा.

मध

मध देखील फ्रीजमध्ये ठेवू नये. मध भांड्यात ठेवल्यास ते अनेक वर्षे टिकते. पण फ्रीजमध्ये ठेवल्यास ते घट्ट होऊ शकते आणि जारमधून काढणे कठीण होऊ शकते.

बटाटा

बटाटे फ्रीजमध्ये न ठेवण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील स्टार्च साखरेत बदलू लागते. त्यामुळे बटाट्याच्या चवीवर परिणाम होऊ शकतो. बटाटे कागदी पिशवीत थंड आणि गडद ठिकाणी ठेवावेत.

लोणचे

लोणच्यामध्ये व्हिनेगर असते. फ्रीजमध्ये ठेवल्याने ते खराब होतेच पण इतर गोष्टीही खराब होतात.

तेल

नारळ आणि ऑलिव्ह ऑइल यांसारखी काही तेलही फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रीजमध्ये ठेवल्यावर ते घट्ट होऊन लोण्यासारखे घट्ट होते. फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर त्यांना सामान्य तापमानात येण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.

अॅव्होकॅडो

फ्रिजमध्ये अॅव्होकॅडो ठेवल्याने त्यांच्या पिकण्याचा वेग कमी होतो. याचा अर्थ ते दीर्घकाळ कच्चे राहतात. दुसरीकडे जर तुम्हाला ते त्यांच्या मूळ चवीनुसार खायचे असतील तर त्यांना बाहेर ठेवा आणि त्यांना नैसर्गिकरित्या पिकू द्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग