Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. खालील जोक्स वाचा!
नदी किनारी एक जोडपं बसलेलं असतं…
वातावरण खूपच रोमँटिक झालेलं असतं.
प्रेयसी - तुझा काय प्लान आहे.
प्रियकर - तोच नेहमीचा
१९९ चा, १.५ जीबी पर डे…
प्रेयसी - तू मोबाईल मध्येच मरणार! मी चालले…
...
नखं कापल्यानंतरही जो स्टीलच्या डब्याचं घट्ट बसलेलं
झाकण उघडण्याची हिम्मत ठेवतो,
तो आयुष्यात काहीही करू शकतो…!
...
कधी कधी असं वाटतं की सगळ सोडून द्यावं आणि
दूर हिमालयात निघून जावं…
पण मग मनात विचार येतो,
तिथं नेट चालल नाही तर…!
...
चम्या एकदा नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला गेला…
बॉस - काय झालं?
संता - सर मी, खूपच घाबरून गेलोय…
बॉस – अरे घाबरू नको,
मला अगदी तुझा मित्र समजून बोल…
चम्या - च्यायला, मी तर उगाच घाबरत होतो,
मग काय चाललय बाकी? वहिनी कशा आहेत?
मुलबाळ मजेत ना?
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या