मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  joke of the day : मी तुझा जीव घेईन, या वाक्याचं इंग्रजी भाषांतर जेव्हा गुरुजी विचारतात…

joke of the day : मी तुझा जीव घेईन, या वाक्याचं इंग्रजी भाषांतर जेव्हा गुरुजी विचारतात…

HT Marathi Desk HT Marathi
Apr 28, 2024 09:19 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

joke of the day : मी तुझा जीव घेईन, या वाक्याचं इंग्रजी भाषांतर जेव्हा गुरुजी विचारतात…
joke of the day : मी तुझा जीव घेईन, या वाक्याचं इंग्रजी भाषांतर जेव्हा गुरुजी विचारतात…

 

ट्रेंडिंग न्यूज

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. खालील जोक्स वाचा!

संतू खूप मोठमोठ्यानं रडत असतो…

अतू - काय झालं…? का रडतोयस रे? 

संतू - अरे काय सांगू?

अंतू - सांग, मन मोकळं करून टाक

ज्या मुलीला विसरायचा प्रयत्न करतोय,

तिच नावच आठवत नाहीये!

...

शाळेत इंग्रजीचा तास सुरू असतो.

बंड्याचं इंग्रजी कच्चं असल्यामुळं गुरुजी नेहमी त्यालाच पकडतात.

आजही तसंच झालं…

गुरुजी - बंड्या, मी तुझा जीव घेईन

याच इंग्रजीत भाषांतर कर…

बंड्या - ते इंग्रजी गेलं उडत…

तुम्ही हात तरी लाऊन बघा…

शाळेत इंग्रजीचा तास सुरू असतो.

गुरुजी - गण्या It कधी वापरतात?

संप्या - घर बांधताना…!

(गुरुजींनी संप्याची चंपी केली!)

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel

विभाग