Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. खालील जोक्स वाचा!
गुरुजी - बंडू, उठ, मला सांग
४५ भागिले ५ बरोबर किती…?
बंडू - ९
गुरुजी - आणि बाकी?
बंडू - बाकी निवांत! तुमचंच सांगा…!
(गुरुजींनी मरेस्तोवर मारला…)
...
ऑपरेशनसाठी एक पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये जातो...
तिथं ऑपरेशन टेबलजवळ त्याला एक फुलांचा हार दिसतो...
पेशंट - डॉक्टर हा फुलांचा हार कशासाठी?
डॉक्टर - आज माझं पहिलं ऑपरेशन आहे.
सक्सेकफुल झालं तर मला, नाहीतर तुला…!
…
तर नेहमी आतला आवाज ऐका!
आतला आवाज म्हणजे,
किचनमधला आवाज
अहो ऐकल का?
…
एका रात्री अभिनेता धमेंद्रच्या घरात चोर शिरतो.
खडबड आवाज ऐकून धर्मेद्रला जाग येते
आणि
तो सवयीप्रमाणे ओरडतो,
कुत्ते… कमीने…
चोर शांतपणे म्हणतो,
ठीक आहे बाबा, कमी नेतो! पण ओरडू नको
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)