Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. खालील जोक्स वाचा!
एका मित्रानं बंड्याकडं १० हजार रुपये मागितले…
बंड्या - सॉरी मित्रा, माझ्याकडं पैसे नाहीत
पण तू माझ्याकडून एवढ्या पैशाची अपेक्षा ठेवली…
हे ऐकून लय, बरं वाटलं!
…
नवरा - मी नेता झालो ना तर,
आख्खा देश बदलून टाकीन…
बायको - जरा कमी पेत जा…
लुंगी समजून माझी साडी नेसलीय तुम्ही…
ती बदला आधी…
…
डॉक्टर (संत्याला) - सांगण्यास वाईट वाटतंय की,
तुमची एक किडनी फेल झालीय!
हे ऐकल्यावर संता खूप रडतो…
थोड्या वेळानं स्वत:ला सावरतो.
नंतर निर्विकार चेहऱ्यानं डॉक्टरला विचारतो…
डॉक्टर साहेब, किती गुणांनी…?
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)