मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Heat wave Care : शहरात पसरलीय उष्‍णतेची लाट, सुरक्षित राहण्‍यासाठी या महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवा!

Heat wave Care : शहरात पसरलीय उष्‍णतेची लाट, सुरक्षित राहण्‍यासाठी या महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवा!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Apr 20, 2024 01:41 PM IST

Summer Health Care Tips: उष्‍माघात लहान ते मोठे कोणालाही होऊ शकतो. याचमुळे उष्‍माघातावर प्रतिबंध ठेवण्‍यासाठी विशिष्‍ट काळजी घेतली पाहिजे.

keep these important things in mind to stay safe in heat wave
keep these important things in mind to stay safe in heat wave (Rahul Raut/HT file photo)

Heatwave prevention Tips: भारतातील अनेक शहरांमध्‍ये, विशेषत:, गुजरात, महाराष्‍ट्र, उत्तर कर्नाटक, ओडिशा, पश्चिम मध्‍यप्रदेश आणि आंध्रप्रदेश येथे पुढील काही दिवसांमध्‍ये प्रखर उष्‍णतेची लाट येण्‍याचा अंदाज वर्तवण्‍यात आला आहे. अशा प्रखर तापमानामध्‍ये काय करावे आणि काय करू नये याबाबत जनजागृती करण्‍यात आली असली तरी याबाबत अधिक मार्गदर्शनाची गरज आहे, ज्‍यामुळे लोक या स्थितीला बळी पडणार नाहीत. याबद्दल अधिक जाणून घेऊयात फोर्टिस हॉस्पिटल कल्‍याण येथील ट्रॉमा अँड इमर्जन्‍सी सर्विसेसचे प्रमुख डॉ. सुधीर गोरे यांच्याकडून…

ट्रेंडिंग न्यूज

मानवी शरीर काही प्रमाणात उष्‍णता सहन करू शकते, पण प्रखर उष्‍णता विशेषत: वेळेवर उपचार न केल्‍यास घातक ठरू शकते. मुले, वृद्ध व्‍यक्‍ती आणि स्‍ट्रोक, हृदयविषयक आजार व श्‍वसनविषयक आजार अशा आजारांनी पीडित व्‍यक्‍तींसाठी उष्‍ण तापमान घातक ठरू शकते. काही केसेसमध्‍ये प्रखर तापमानामुळे 'उष्‍माघात' देखील होऊ शकतो. या गंभीर स्थितीमध्‍ये प्रखर उष्‍ण तापमानामुळे शरीराचे तापमान १०४ फॅरेडहून अधिकपर्यंत वाढते. परिणामत: शरीर तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाही, ज्‍यामुळे तापमान वाढते आणि घाम येत नाही, परिणामी शरीराला थंडावा देखील मिळत नाही. उष्माघात झालेल्‍या व्‍यक्‍तीमध्‍ये गोंधळून जाणे, डोकेदुखी, मळमळ व चक्‍कर येणे अशी लक्षणे दिसून येतात. वेळेवर या लक्षणांवर उपचार केला नाही तर प्रभावित व्‍यक्‍तीचा मृत्‍यू होऊ शकतो किंवा कायमचे विकलांगत्‍व येऊ शकते.

Heatwave Precaution Tips: सरकारने दिला उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'अशी' घ्या स्वतःची काळजी!

उष्‍माघाताला कशाप्रकारे प्रतिबंध करावे? 

• समाज व समुदाय शक्‍य असल्‍यास रस्‍त्‍यांच्‍या कडेला पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय करू शकतात.

• दिवसभर हायड्रेटेड राहण्‍यासाठी घराबाहेर पडताना पाण्‍याची बॉटल सोबत ठेवा. गरज असल्‍यास पाण्‍याऐवजी फ्रेश ज्‍यूस व ग्‍लुकोज वॉटर सोबत ठेवू शकता.

• मद्यपान, चहा व कॉफी यासारखी गरम किंवा शर्करायुक्‍त पेये टाळा, कारण यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.

• आंबे, कलिंगड, काकडी व हिरव्‍या पालेभाज्‍या अशा हंगामी फळांचे सेवन करा. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि आवश्‍यक व्हिटॅमिन्‍स व मिनरल्‍स मिळतात. तसेच, ही फळे सहजपणे पचतात आणि हायड्रेशन वाढवतात.

• उष्‍ण तापमान असताना घराबाहेर पडल्‍यास सूर्यप्रकाशाच्‍या घातक किरणांपासून संरक्षणासाठी छत्रीचा वापर करा.

• विशेषत: घराबाहेरून आल्‍यानंतर शरीराला थंडावा मिळण्‍यासाठी दिवसातून दोनदा आंघोळ करा. कोमट पाण्‍याने आंघोळ करणे चांगले आहे.

Summer Care Tips: या ५ मसाल्यांचे उन्हाळ्यात माफक प्रमाणात सेवन केले पाहिजे!

उष्‍माघातापासून प्रतिबंधासाठी सर्वांनी कोणत्‍या गोष्‍टी लक्षात ठेवाव्‍यात? 

• आपत्‍कालीन स्थितीत डॉक्‍टर व नागरी प्राधिकरणांचे संपर्क क्रमांक उपयोगी ठरू शकतात.

• कोणताही वैद्यकीय आजार असल्‍यास डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याचे पालन करा.

• आजारी पडल्‍यास त्‍वरित जवळच्‍या हॉस्पिटलमध्‍ये वैद्यकीय उपचार घ्‍या.

• दुपारच्‍या वेळी घराबाहेर पडू नका आणि अधिक आरामदायीपणासाठी सैल सुती कपडे परिधान करा (शक्‍यतो हलक्‍या रंगांचे).

• बाहेरून घरी आल्‍यानंतर शरीराला उत्‍साहित करण्‍यासाठी थंड, रिफ्रेशिंग पेय जये लिंबू सरबत, ताक, नारळपाणी किंवा पाणी प्‍या.

Summer Pregnancy Tips: गरोदर मातांनी काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या टिप्स!

उष्‍णतेसंबंधित समस्‍या उद्भवल्‍यास व्‍यक्तीने त्‍वरित कोणते उपाय करावेत? उष्‍णतेसंबंधित समस्‍या उद्भवल्‍यास अस्‍वस्‍थपणा किंवा संभाव्‍य उष्‍णता-संबंधित आजारांना प्रतिबंध करण्‍यासाठी त्‍वरित उपाय करणे महत्त्वाचे आहे. शांत ठिकाणी आराम करणे, पाय उंच ठेवून झोपत रक्‍ताभिसरणाची खात्री घेणे, उष्‍णतेपासून आराम मिळण्‍यासाठी अतिरिक्‍त कपडे काढून टाकणे, शरीरातील कमी झालेली पाण्‍याची पातळी भरून काढण्‍यासाठी पाणी पिणे, शरीराचे तापमान कमी करण्‍यासाठी थंड पाण्‍याच्‍या टॉवेलने शरीर पुसून काढणे आणि लवकर रिकव्‍हरीसाठी शांत व थंड वातावरणात आराम करणे हे काही उपाय आहेत.

WhatsApp channel