Health Benefits of Dancing: दरवर्षी २९ एप्रिल रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश जगभरातील नर्तकांना प्रोत्साहन देणे आणि नृत्याच्या विविध प्रकारांना प्रोत्साहन देणे हा आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का की नृत्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत? जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत नसाल तर दररोज फक्त १५ ते २० मिनिटे डान्ससाठी काढा. तुमचे आवडते गाणे लावा आणि त्यावर डान्स करा. डान्समुळे संपूर्ण शरीर सक्रिय होते आणि तणावही दूर होतो. आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त, नृत्याचे असेच काही फायदे जाणून घेऊया.
> डान्समुळे शरीराची लवचिकताही वाढते आणि हाडे मजबूत होतात.
> डान्समुळे तुम्हाला उत्साही वाटते आणि थकवा येण्याची समस्या दूर होते.
> हृदयासाठी डान्स हा एक उत्तम कार्डिओ व्यायाम आहे. याचा अर्थ, दररोज थोडा वेळ डान्स केल्याने हृदय निरोगी राहते.
> डान्समुळे चरबी झपाट्याने कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी सगळ्या पद्धती ट्राय करून तुम्ही कंटाळला असाल तर एकदा डान्स करून पहा. झुंबा, बॅले, शास्त्रीय, हिप हॉप, सर्व प्रकारचे नृत्य लठ्ठपणा कमी करते.
> डान्समुळे शरीरात थकवा येतो ज्यामुळे चांगली झोप लागते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल तर औषधांऐवजी डान्सची मदत घ्या.
> डान्समुळे शरीरातील रक्त परिसंचरण सुधारते, जे शरीराच्या अनेक अवयवांना सुरळीतपणे कार्य करण्यासाठी आवश्यक असते. नैराश्याचा सामना करण्यासाठी डान्स थेरपी खूप प्रभावी आहे.
> बऱ्याच संशोधनांनी देखील अप्रूव्ह केलं आहे की आपल्या आवडत्या गाण्यावर नृत्य करणे दुःखी मूड हलका करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही याला तुमच्या रुटीनचा भाग देखील बनवू शकता. यासाठी वयोमर्यादा महत्त्वाची नसते, म्हणजेच प्रत्येक वयात नृत्य मुक्तपणे करता येते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)