Sweat Smell Removing: कपड्यांमधला घामाचा वास दूर करण्यासाठी ट्राय करा या सोप्या आयडिया!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sweat Smell Removing: कपड्यांमधला घामाचा वास दूर करण्यासाठी ट्राय करा या सोप्या आयडिया!

Sweat Smell Removing: कपड्यांमधला घामाचा वास दूर करण्यासाठी ट्राय करा या सोप्या आयडिया!

Apr 20, 2024 12:06 PM IST

Home remedy for bad smell: घामाचा वास कोणालाच आवडत नाही. या वासामुळे कधी कधी लाज वाटते. याचमुळे आम्ही तुम्हाला कपड्यांमधून दुर्गंधी कशी दूर करावी हे सांगणार आहोत.

how to remove smell of sweat from clothes
how to remove smell of sweat from clothes (freepik)

Get rid of sweat smell in clothes: कडक उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्यात अनेक समस्या (summer care tips) होतात. यातील एक कॉमन समस्या म्हणजे खूप घाम येणे. उन्हाळ्यातील या घामाला दुर्गंधी फार असते. हा घाम तुमच्या कपड्यांवरही चिकटून राहते, त्यामुळे त्यांना वास येऊ लागतो. अनेकदा बॉडी स्प्रेही करूनही दुर्गंधी जात नाही. घामाच्या वासामुळे कधीकधी लाजही वाटते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला कपड्यांमधला वास कसा दूर करायचा याच्या काही टिप्स (home remedies) सांगणार आहोत.

बेकिंग सोडाचा उपयोग

बेकिंग सोडा (baking soda) कपड्यांमधून दुर्गंधी दूर ठेवेल. ते धुताना तुम्हाला फक्त बेकिंग पावडर घालायची आहे. असे केल्याने कपडे बुरशी आणि दुर्गंधीपासून दूर राहतील.

summer Diet: या गोष्टी कडक उन्हात पोटाला ठेवतात थंड, शरीरही राहते हेल्दी, जाणून घ्या यादी!

जास्त वेळ कपडे भिजवू ठेवू नकात

कपडे जास्त वेळ भिजत ठेवू नका, घाणेरडे कपडे जास्त काळ साठवून ठेवू नका, फक्त चांगली डिटर्जंट पावडर वापरा. या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन उपाययोजना केल्यास ही समस्या टाळता येऊ शकते.

Cold Coffee Recipe: मलईदार, फेसाळलेली कोल्ड कॉफी मशीनशिवाय घरीच बनवा, नोट करा रेसिपी!

लिंबू करेल मदत

लिंबू कपड्यांमधून दुर्गंधी दूर करण्यात मदत करेल. यासाठी फक्त एक बादली पाण्यात घाला आणि कपडे बुडवा. त्यातील ऍसिड गुणधर्म कपड्यांमधून दुर्गंधी दूर करण्यात मदत करतील.

Summer Pregnancy Tips: गरोदर मातांनी काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या टिप्स!

कपडे उलटे करून वापरा

आपण सर्वजण अनेकदा कपडे धुतो तेव्हाही त्यातला घामाचा वास जात नाही. धुतल्यानंतरही घामाचा वास जात नाही. कपडे वारंवार धुतल्यामुळे ते लवकर खराब होतात. अशा वेळी घामाचा वास दूर करण्यासाठी कपडे उलटे करून उन्हात वाळवावेत. असे केल्याने कपड्यांमधून येणारा वास सहज निघून जाईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner