मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Til Paratha: तिळाचे लाडू चाखले असतीलच पण, कधी त्याचा पराठा करून पाहिला आहे का? ट्राय करा रेसिपी

Til Paratha: तिळाचे लाडू चाखले असतीलच पण, कधी त्याचा पराठा करून पाहिला आहे का? ट्राय करा रेसिपी

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 10, 2023 12:27 PM IST

Makar Sankranti Special Recipe: तुमच्यासाठी तीळ पराठा रेसिपी घेऊन आलो आहोत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने या छानशा डिशसोबत तुम्ही तुमच्या शुभ सणाची सुरुवात करू शकता.

मकर संक्रांती स्पेशल रेसिपी
मकर संक्रांती स्पेशल रेसिपी (Freepik)

Winter Recipe: तिळाचे लाडू खायला कोणाला आवडत नाही. दरवर्षी १४ जानेवारीला मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी तीळ आणि तिळापासून बनवलेले पदार्थ आवर्जून खाल्ले जातात. विशेषतः तिळाचे लाडू. पण तुम्ही कधी तिळाचा पराठा खाल्ले आहे का? चला हरकत नाही! आज आम्ही तुमच्यासाठी तिळाचे पराठा बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. तीळ, गूळ, तूप आणि खोबरे हे तिळ पराठा बनवण्यासाठी आवश्यक आहे. तिळाचा प्रभाव उष्ण मानला जातो. जे तुमच्यासाठी थंडीच्या वातावरणात खूप फायदेशीर आहे. म्हणूनच हा पराठा खाल्ल्याने तुमचे शरीर उबदार राहते. याशिवाय तिळाचा पराठा खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्तीही मजबूत होते. तिळाचा पराठा चवीला गोड असतो. मकर संक्रांतीच्या सणाला हे करून तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता.

तीळ पराठा बनवण्यासाठी साहित्य

गव्हाचे पीठ- १ वाटी

तीळ- १/२ वाटी (भाजलेले)

गूळ- १ वाटी

देशी तूप- ५० ग्रॅम

नारळ किसून

तीळ पराठा कसा बनवायचा?

तिळाचा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम गव्हाचे पीठ परातीत चाळून घ्या.

आता त्यात २ चिमूट मीठ, तीळ आणि नारळ किसून आणि गूळ वितळवून घ्या.

आता मऊ पीठ मळून घ्या. १५ मिनिटे पीठ सेट करण्यासाठी ठेवा.

कढईला तूप लावून गरम करा.

पिठाचे गोळे करून पराठ्यासारखे लाटून घ्या.

आता पराठा गरम तव्यावर ठेवून दोन्ही बाजूंनी तूप लावून मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

आता तुमचा चविष्ट आणि आरोग्यदायी तिळाचा पराठा तयार आहे.

आता त्यावर पांढरे बटर लावून गरम चहासोबत सर्व्ह करा.

WhatsApp channel