मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ragi Laddoos Recipe: हिवाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर खा नाचणीचे लाडू, बघा रेसिपी

Ragi Laddoos Recipe: हिवाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर खा नाचणीचे लाडू, बघा रेसिपी

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 02, 2023 11:27 AM IST

Health Care: संधिवात आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहेत. नाचणीच्या पिठाचे लाडू बनवण्याची पद्धत जाणून घ्या.

Ragi Laddoos
Ragi Laddoos (Freepik)

Winter Care: हिवाळ्यात शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे गरम पदार्थ खाल्ले जातात. हे पदार्थ तुमच्या शरीराला फक्त उबदार ठेवत नाहीत तर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. नाचणीच्या पिठाचे लाडू हिवाळ्यात बेस्ट ठरतात. हे लाडू अतिशय आरोग्यदायी आणि चवदार असतात. त्यांना बनवायलाही जास्त वेळ लागत नाही. संधिवात आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहेत. याचे सेवन केल्याने पाठदुखी आणि हाडांशी संबंधित अनेक समस्या दूर राहण्यास मदत होते. हिवाळ्यात नाचणीचे हे लाडू जरूर करून पहा. ते बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.

नाचणीचे लाडू बनवण्यासाठी साहित्य

नाचणीचे पीठ - १ वाटी

पाम शुगर- अर्धा कप

किसलेले नारळ - १/४ कप

वेलची पावडर - १/४ टीस्पून

काळे तीळ - २ टेस्पून

तूप - अर्धी वाटी

शेंगदाणे - २ टेस्पून

नाचणीचे लाडू कसे बनवायचे?

> गॅसवर तवा ठेवा. आता मंद आचेवर खोबरे, शेंगदाणे आणि तीळ वेगवेगळे भाजून घ्या. त्यांना थोडा वेळ थंड होऊ द्या.

> यानंतर शेंगदाण्याचे कव्हर काढून घ्या. आता बदाम एक चमचा तुपात भाजून घ्या.

> नाचणीचे पीठ २ ते ३ चमचे तुपात सुमारे १५ ते २० मिनिटे परतून घ्या. त्यात गरजेनुसार जास्त तूपही घालू शकता.

> आता त्यात साखर आणि वेलची घाला. या सर्व गोष्टी नीट मिसळा. या मिश्रणात नारळ, बदाम, शेंगदाणे आणि तीळ घाला.

> या मिश्रणापासून छोटे छोटे लाडू बनवा. त्यानंतर त्यांना सर्व्ह करा आणि त्यांचा आनंद घ्या.

नाचणीचे लाडू खाण्याचे फायदे

नाचणीमध्ये फायबर, कॅल्शियम, प्रोटीन आणि अनेक अँटीऑक्सिडंट असतात. त्यात लोह असते. याचे सेवन केल्याने शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही. नाचणीच्या पिठाचे लाडू खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत राहण्यास मदत होते. नाचणीमध्ये फायबर असते ज्यामुळे याचे सेवन केल्याने तुम्हाला बराच काळ पोट भरलेले वाटते. हे जलद वजन कमी करण्यास मदत करते. नाचणीमध्ये पॉलिफेनॉल आणि फायबर देखील असतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. नाचणीचा वापर करून तुम्ही कुकीज, हलवा आणि डोसा इत्यादी बनवू शकता. तुम्ही नाचणीचे सेवन स्प्राउट्सच्या रूपातही करू शकता.

WhatsApp channel