मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Guava Kheer Recipe: बनवा पेरू खीर, फॉलो करा रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी!

Guava Kheer Recipe: बनवा पेरू खीर, फॉलो करा रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Nov 01, 2022 09:07 AM IST

पेरूची खीर खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे

पेरू खीर
पेरू खीर

लहान असो वा वडीलधारी व्यक्ती, खीरचे नाव ऐकताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. तांदूळ, शेवया आणि गाजर यांसारख्या पदार्थांनी तुम्ही खीर अनेक वेळा बनवली असेल. पण या सीझनची पेरू खीर नक्की करून पहा. पेरूची खीर खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे. चला तर मग विलंब न लावता जाणून घेऊया पेरूच्या खीरची ही चविष्ट रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

पेरू खीर बनवण्यासाठी साहित्य

३ पेरू

२०० मिली दूध

आवश्यकतेनुसार मनुका

गरजेनुसार काजू

२ चमचे तूप

१ वाटी गूळ

गरजेनुसार वेलची पावडर

आवश्यकतेनुसार पाणी

पेरूची खीर बनवण्याची पद्धत

१) पेरूची खीर बनवण्यासाठी प्रथम पेरू सोलून त्याचे बिया काढून त्याचे तुकडे करून बारीक वाटून घ्या.

२) आता एका पातेल्यात गूळ आणि थोडे पाणी टाकून गूळ विरघळेपर्यंत उकळवा. नंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

३) आता एक कढई घेऊन त्यामध्ये तूप आणि काजू घालून सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

४) यानंतर मनुका घालून एक मिनिट परतून घ्या.

५) त्याच पॅनमध्ये पेरूची बनवलेली पेस्ट घाला आणि सुमारे १० मिनिटे शिजवा.

६) थोडे थोडे दूध घाला आणि सतत ढवळत राहा.

७) यानंतर वेलची पावडर आणि गूळ पाणी घालून सर्वकाही चांगले मिसळा आणि ३-४ मिनिटे उकळू द्या.

८) नंतर एका भांड्यात काढून गरमागरम सर्व्ह करा.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग