मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat Kohli Record : किंग कोहलीने इतिहास रचला, आयपीएलमध्ये मोठा टप्पा गाठला, जाणून घ्या

Virat Kohli Record : किंग कोहलीने इतिहास रचला, आयपीएलमध्ये मोठा टप्पा गाठला, जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 18, 2024 10:51 PM IST

Virat Kohli 700 Fours In IPL : आयपीएल २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या ६८व्या लीग सामन्यात कोहलीने एका विशेष विक्रमावर आपले नाव नोंदवले आहे. कोहली ७०० चौकारांचा टप्पा पार करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.

Virat Kohli 700 Fours In IPL
Virat Kohli 700 Fours In IPL (PTI)

Virat Kohli IPL 2024 Record : इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ६८ वा सामना आज (१८ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एक मोठा विक्रम केला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

वास्तविक, कोहली आयपीएलच्या इतिहासात ७०० चौकारांचा टप्पा पार करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा आकडा शिखर धवननेच पार केला होता.

आता धवनच्या या यादीत कोहलीचाही समावेश झाला आहे. धवनने या आयपीएलध्ये आतापर्यंत सर्वाधिक ७६८ चौकार मारले आहेत. आता कोहली ७०० हून अधिक चौकार मारणारा फलंदाज बनला आहे. या यादीत डेव्हिड वॉर्नर ६६३ चौकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर रोहित शर्मा ५९९ चौकारांसह चौथ्या स्थानावर आणि सुरेश रैना ५०६ चौकारांसह पाचव्या स्थानावर आहे.

कोहलीने चेन्नईविरुद्ध ४७ धावांची इनिंग खेळली

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या जात असलेल्या या सामन्यात कोहलीने २९ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याचा स्ट्राइक रेट १६२.०७ होता. कोहलीने कर्णधार फाफ डू प्लेसिससह पहिल्या विकेटसाठी ७८ (५८ चेंडू) धावांची भागीदारी केली.

आरसीबीच्या २१८ धावा

करा किंवा मरो या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांत ४ गडी गमावून २१८ धावा केल्या. आता आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला २०० धावांच्या आत मर्यादित ठेवावे लागेल. आरसीबीसाठी विराट कोहलीने २९ चेंडूत ४७ धावा, फाफ डू प्लेसिसने ३९ चेंडूत ५४ धावा, रजत पाटीदारने २३ चेंडूत ४१ धावा आणि कॅमेरून ग्रीनने १७ चेंडूत नाबाद ३८ धावा केल्या. मिचेल सँटनर वगळता चेन्नईच्या प्रत्येक गोलंदाजाने धावा भरपूर दिल्या.

कोहली IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू 

आयपीएलच्या इतिहासात विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या स्पर्धेतील २५१ सामन्यांच्या २४३ डावात फलंदाजी करताना त्याने ३८.६९ च्या सरासरीने आणि १३१ च्या स्ट्राईक रेटने ७९७१ धावा केल्या आहेत. यात त्याने ८ शतके आणि ५५ अर्धशतके केली आहेत. कोहलीने ७०२ चौकार आणि २७१ षटकार मारले आहेत.

आयपीएल २०२४ मध्ये ऑरेंज कॅपचे वर्चस्व कायम 

आयपीएल २०२४ मध्ये विराट कोहलीच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. १४ सामन्यांच्या १४ डावात फलंदाजी करताना त्याने ६४.३६ च्या सरासरीने आणि १५५ च्या स्ट्राईक रेटने ७०८ धावा केल्या आहेत. यात त्याने १ शतक आणि ५ अर्धशतके केली आहेत. कोहलीने ५९ चौकार आणि ३७ षटकार मारले आहेत.

IPL_Entry_Point