मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tandoori Mayonnaise Recipe: घरच्या घरी बनवा तंदूरी मेयोनीज! वाढवेल पदार्थांची चव

Tandoori Mayonnaise Recipe: घरच्या घरी बनवा तंदूरी मेयोनीज! वाढवेल पदार्थांची चव

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Nov 05, 2022 10:03 AM IST

Tandoori Mayonnaise Recipe In Marathi: पास्तापासून सँडविचपर्यंत प्रत्येक गोष्टीची चव वाढवण्यासाठी तंदूरी मेयोनीजची वापर केला जातो.

तंदूरी मेयोनीज
तंदूरी मेयोनीज (Freepik)

कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी विविध मसाल्यांचा वापर केला जातो. त्याचबरोबर जंक फूड बनवण्यासाठी मसाल्यांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे सॉस वापरले जातात. आजकाल बाजारात उपलब्ध तंदूरी मेयोनीज लोकांना खूप आवडते. त्याच्या मदतीने विविध प्रकारचे सँडविच तयार करता येतात. हे पिझ्झा किंवा पास्तामध्येही वापरता येऊ शकते. तुम्ही तंदूरी मेयोनीज घरीच बनवू शकता. जाणून घ्या तंदूरी मेयोनीज बनवण्याची रेसिपी...

ट्रेंडिंग न्यूज

कसं बनवायचं?

तंदूरी मेयोनीज बनवण्यासाठी प्रथम नॉर्मल/ बेसिक मेयोनीज तयार करा. यासाठी प्रथम कोल्ड क्रीम घ्या आणि मिक्सरच्या भांड्यात टाका, त्यात पिठीसाखर, तेल, मीठ, मोहरी पूड आणि ठेचलेली काळी मिरी घालून बारीक करा. ते घट्ट दिसायला लागल्यावर आता त्यात व्हिनेगर किंवा लिंबू टाकून परत एकदा फिरवा. या सोप्या रेसिपीने तुमचे मेयोनीज तयार आहे.

Noodles Balls Recipe: चायनीज फूडची आवड आहे? बनवा नूडल्स बॉल्स, नोट करा स्वादिष्ट रेसिपी!

तंदूरी मेयोनीजसाठी मसाला बनवा

ते बनवण्यासाठी एका पातेल्यात जिरे, धणे, काळी मिरी, ओवा, काळी वेलची, मोहरी, मेथी दाणे, लवंगा आणि दालचिनी भाजून घ्या. नंतर गॅस बंद करून त्यात आमचूर पावडर, हिंग, कसुरी मेथी, डेगी मिर्च आणि मीठ घालून सर्वकाही नीट मिक्स करून थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यावर त्याची बारीक पावडर करून घ्या.

तंदूरी मेयोनीज कसे बनवायचे?

तंदूरी मेयोनीज बनवण्यासाठी बनवलेला हा मसाला आणि मेयोनीज एकत्र मिसळा. व्यवस्थित मिश्रण मिक्स करा. पनीर टिक्का, तंदूरी मोमोज सारखे पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही हा तंदुरी मेयोनीज वापरू शकता.

WhatsApp channel

विभाग