Sweet Poha Recipe: सकाळी सकाळी गोड खावंसं वाटत आहे? नाश्त्यात बनवा गोड पोहे! जाणून घ्या रेसिपी-how to make sweet poha know breakfast recipe ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sweet Poha Recipe: सकाळी सकाळी गोड खावंसं वाटत आहे? नाश्त्यात बनवा गोड पोहे! जाणून घ्या रेसिपी

Sweet Poha Recipe: सकाळी सकाळी गोड खावंसं वाटत आहे? नाश्त्यात बनवा गोड पोहे! जाणून घ्या रेसिपी

Apr 15, 2024 09:23 AM IST

Breakfast Recipe: सकाळी तुम्हाला झटपट काही बनवायचं असेल तर गोड पोहे बनवण्याची ही रेसिपी जाणून घ्या.

Sweet Indian Breakfast
Sweet Indian Breakfast (Palate's Desire/ YouTube )

How to make Sweet Poha: भारतीय घरात नाश्त्यात पोहे खाणे खूप सामान्य आहे. आठवड्यातून दोनदा तरी पोहे बनवले जातात. हा फायबर युक्त नाश्ता दिवसभर पोट भरलेला राहतो आणि भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. हे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया वेगवान होते. पण जर तुम्ही नेहमी नाश्त्यात एकाच प्रकारचे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर हटके रेसिपी बनवा. तुम्ही रेगुलर पोह्यांपेक्षा गोड पोहे करून पहा. हे खूप चवदार आणि वेगळे आहे. मुलांनाही ते खायला खूप आवडतं. त्यामुळे तुम्ही गोड पोहे कधी खाल्ले नसतील किंवा त्याची रेसिपी करून पाहिली नसेल तर एकदा नक्की करून पहा. चला जाणून घ्या रेसिपी.

जाणून घ्या साहित्य

-पोहे

- दालचिनी

- गूळ

- काळी मोहरी

- कढीपत्ता

- हिरवी मिरची

Indori Poha Recipe: नाश्त्यात बनवा इंदौर स्टाइलचे पोहे, जाणून घ्या रेसिपी!

जाणून घ्या कृती

गोड पोहे बनवण्यासाठीएक कढई घ्या. त्यात थोडे तेल, काळी मोहरी आणि हिरवी मिरची टाकायची आहे. यानंतर कढीपत्ता आणि गूळ घाला. ते वितळायला लागल्यावर त्यात थोडे पाणी घालून मिक्स करा. ते चांगले एकजीव झाल्यावर त्यात लाल तिखट टाका आणि नंतर हलके शिजू द्या. आता त्यात भिजवलेले पोहे घाला. सर्वकाही व्यवस्थित शिजू द्या. मिक्स करून मग त्यात पोहे घाला. थोडी कोथिंबीर चिरून मिक्स करा.

Best milk drinking Time: दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? ज्यामुळे शरीराला मिळतील अधिक फायदे!

त्यामुळे आजपर्यंत जर तुम्ही ही पोह्याची रेसिपी ट्राय केली नसेल तर यावेळी नक्की करून पहा. जर तुम्हाला त्याची चव आवडली तर तुम्ही आवर्जून पुन्हा पुन्हा बनवाल.

Tips for success: महिलांनो काम आणि कौटुंबिक जीवनातील निरोगी संतुलन राखण्यासाठी फॉलो करा या टिप्स!

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)