मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Eye Makeup Remover: डोळ्यांचा मेकअप काढण्यासाठी घरीच बनवा रिमूव्हर!

Eye Makeup Remover: डोळ्यांचा मेकअप काढण्यासाठी घरीच बनवा रिमूव्हर!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 30, 2022 02:45 PM IST

Natural Makeup Remover: डोळ्यांचा मेकअप करायला अनेकांना आवडतं पण त्याला काढताना वाट लागते. डोळ्यांचा मेकअप काढण्यासाठी केमिकलमुक्त- रिमूव्हर घरीच बनवा.

मेकअप रिमूव्हर
मेकअप रिमूव्हर (Freepik )

Eye Makeup Remover: डोळ्यांवर केलेला मेक-अप काढताना, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की जे काही वापरले जात आहे ते डोळ्यांसाठी सुरक्षित असले पाहिजे आणि त्याचा प्रभाव जलद दर्शविला पाहिजे जेणेकरून डोळ्यांना घासावे लागणार नाही. बराच वेळ जर आय मेकअप रिमूव्हर चांगला नसेल तर खूप वेळ चोळावे लागते, त्यामुळे डोळ्यांनाही नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत, येथे अशा काही गोष्टी सांगितल्या जात आहेत, ज्याद्वारे डोळ्यांचा मेकअप घरीच काढला जाऊ शकतो आणि यामुळे डोळे चिकट किंवा जास्त तेलकट होत नाहीत.

ट्रेंडिंग न्यूज

कोरफड जेल

एक बाउल घ्या आणि त्यात एक १/४ पाणी भरा आणि त्यात १/४ कोरफड जेल घाला. त्यात एक चमचा ग्लिसरीन मिसळा. कॉटन वाइप्स किंवा कापसाचा तुकडा घेऊन हे मिश्रण डोळ्यांचा मेकअप काढण्यासाठी वापरा.

गुलाब पाणी

अर्धा कप गुलाब पाणी घ्या आणि त्यात अर्धा चमचा बदामाचे तेल आणि व्हिटॅमिन ईच्या २ कॅप्सूल मिसळा. या मिश्रणाने डोळ्यांचा मेकअप सहज काढला जाईल. हे मिश्रण एका छोट्या डब्यात भरून ठेवा म्हणजे पुन्हा पुन्हा बनवावे लागणार नाही.

विच हेझेल

तेल आधारित मेकअप आणि पाण्यावर आधारित मेकअप काढण्यासाठी विच हेझेलचा वापर केला जाऊ शकतो. एक स्प्रे बाटली घ्या आणि त्यात 4 चमचे विच हेझेल घाला. त्यावर 2 चमचे बदामाचे तेल टाका आणि बाटलीत २ चमचे ऑलिव्ह ऑईलही मिसळा. हे मिश्रण चांगले हलवा आणि नंतर मेकअप रिमूव्हर वाइपसह वापरा.

जोजोबा तेल

जोजोबा तेलाला नैसर्गिक मेकअप रिमूव्हर देखील म्हटले जाऊ शकते. डोळ्यांचा मेकअप काढण्यासाठी हे उत्तम आहे. ते वापरण्यासाठी बाटलीत थोडे गुलाबपाणी ठेवा आणि जोजोबा तेल घाला. हे द्रव मिसळा आणि डोळ्यांचा मेकअप काढा. डोळ्यांवरही चमक येईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग