मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Paneer Recipe: डिनरमध्ये बनवा आचारी पनीर, पराठा आणि नानसोबत वाढते लज्जत

Paneer Recipe: डिनरमध्ये बनवा आचारी पनीर, पराठा आणि नानसोबत वाढते लज्जत

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 25, 2023 09:02 PM IST

Achari Paneer Recipe: पनीरपासून विविध पदार्थ तयार केले जाऊ शकतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. जर तुम्हाला नेहमीचं पनीर बनवण्याचा कंटाळा आला असेल, तर यावेळी लोणच्याच्या चवीची पनीरची अप्रतिम भाजी तयार करा. ते कसे बनवायचे ते येथे पहा-

आचारी पनीर
आचारी पनीर

Achari Paneer Recipe: रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या पनीर करीची चव अगदी वेगळी असते. दरवेळी प्रमाणे शाही पनीर, कढई पनीर, मटर पनीर बनवण्याचा कंटाळा आला असेल तर यावेळी आचारी पनीर करी ट्राय करा. येथे आम्ही रेस्टॉरंट स्टाईल आचारी पनीरच्या अप्रतिम भाजीची रेसिपी देत आहोत. नान आणि रोटी किंवा पराठासोबत सर्व्ह करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

- लोणचे

- बेसन

- फेटलेले दही

- काजूची पेस्ट

- टोमॅटो

- संपूर्ण लाल मिरची

- हिरवी मिरची चिरलेली

- हळद

- लाल तिखट

- धने पावडर

- जिरे पावडर

- मीठ

- तेल

- ताजी कोथिंबीर

Mint Drinks Recipe: पुदिनापासून बनवा देसी ड्रिंक्स, फक्त उष्णताच नाही तर ॲसिडिटीही होईल दूर

कसे बनवावे

आचारी पनीर बनवण्यासाठी कढईत तेल गरम करा. नंतर त्यात लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या घाला. नंतर काही सेकंद भाजून घ्या. आता टोमॅटो घालून परता आणि मसाले घाला. टोमॅटो मऊ होऊन शिजेपर्यंत शिजवा. तेल वेगळे झाले की ते शिजले असे समजा. आता त्यात काजूची पेस्ट घाला आणि थोडा वेळ मंद आचेवर शिजवा. आता या मसाल्यात लोणचे घालून चांगले मिक्स करा. बेसन घालून २ ते ३ मिनिटे बाकीचे मसाले चांगले मिसळे पर्यंत चांगले शिजवा. गॅस मंद ठेवा आणि नंतर फेटलेले दही घाला आणि ढवळून घ्या, जेणेकरून दही मसाल्यांमध्ये चांगले मिसळेल. 

Chutney Recipe: जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी बनवा लाल मिरचीची चटणी, झटपट होते तयार

थोडा वेळ शिजवून घ्या आणि नंतर पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करा. ताज्या कोथिंबिरीने गार्निश करा आणि गरमागरम सर्व्ह करा. तुम्ही आचारी पनीर नान किंवा रोटीसोबत सर्व्ह करू शकता.

WhatsApp channel

विभाग