मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mint Drinks Recipe: पुदिनापासून बनवा देसी ड्रिंक्स, फक्त उष्णताच नाही तर ॲसिडिटीही होईल दूर

Mint Drinks Recipe: पुदिनापासून बनवा देसी ड्रिंक्स, फक्त उष्णताच नाही तर ॲसिडिटीही होईल दूर

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 24, 2023 07:26 PM IST

Summer Special Drinks: उन्हाळ्यात गरमीपासून आराम मिळवण्यासाठी ड्रिंक्स हा चांगला पर्याय असतो. पुदिना आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात पुदिन्यापासून हे ड्रिंक्स बनवा.

पुदिन्याचे देसी ड्रिंक्स
पुदिन्याचे देसी ड्रिंक्स (unsplash)

Mint or Pudina Desi Drinks Recipe: उन्हाळ्यात जेवण कमी आणि पाणी जास्त पिल्या जाते. जेवणासोबतच काही ड्रिंक्स घेणे देखील आरोग्यासाठी चांगले असते. उन्हाळ्यात पुदीना, काकडी, लिंबू या सारख्या गोष्टी तुम्हाला हायड्रेटेड ठेवतात. त्यामुळे यांचा आहारात समावेश केला पाहिजे. पुदीनाचा वापर करून घरच्या घरी काही देसी ड्रिंक्स बनवता येतात. यामुळे फक्त तुम्हाला उष्णतेपासून आराम मिळत नाही तर तुमची अॅसिडीटी देखील दूर होते. तर चला जाणून घेऊया पुदिनाचे देसी ड्रिंक्स कसे बनवायचे.

ट्रेंडिंग न्यूज

- ४ मिंट टी बॅग

- लिंबाचा रस

- पुदीना (काही पाने)

- आइस क्यूब्स - १० ते १५ तुकडे

- मध किंवा व्हॅनीला कॉफी सिरप

- २ कप सोडा वॉटर

Bread Roll Recipe: झटपट बनवा रवा आणि बटाटाचे ब्रेड रोल, संध्याकाळसाठी आहे परफेक्ट स्नॅक्स

आइस मिंट अँड लाईम बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम ४ कप पाणी उकळून घ्या. यात ३ ते ४ मिंट टी बॅग टाकून ते नीट उकळून घ्या. उकळल्यानंतर हे पाणी थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवा. थोड्यावेळानंतर थंड झालेले हे पाणी एका ग्लास मध्ये घ्या. आता यात क्रश केलेला बर्फ अर्धा भरा. नंतर त्यात १ किंवा २ चमचे लिंबाचा रस टाका. जर तुम्हाला लिंबाचा रस आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप देखील करू शकता. आता यात अर्धा कप सोडा वॉटर टाका. याला नीट मिक्स करून वरतून पुदिन्याचे पान टाकून सर्व्ह करा.

Summer Drinks: उन्हाळ्यात रेफ्रेशिंग फील देते वेलचीचे सरबत, नोट करा बनवण्याची पद्धत

मिंट लस्सी बनवण्यासाठी साहित्य

- अर्धी वाटी पुदिन्याचे पाने

- अर्धा ग्लास पानी

- दोन ग्लास लस्सी

- आइस क्यूब्स

- काळी मिरी

- काळं मीठ

Bitter Gourd: लंच मध्ये अशा पद्धतीने बनवा कारल्याची भाजी, सगळे खातील आवडीने

मिंट लस्सी बनवण्याची पद्धत

पुदिन्याची लस्सी बनवण्यासाठी सर्वप्रमथ एका भांड्यात लस्सी घ्या. आता यात पुदिन्याचे पाने बारीक करून टाका. नंतर यात अर्धा ग्लास थंड पाणी टाका. यात चवीनुसार काळं मीठ आणि काळी मिरी पावडर टाका. आता ग्लास मध्ये घेऊन त्यात आइस क्यूब्स टाकून थंड थंड सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग