मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mango Pickle Recipe: कैरीचं कोरडं लोणचं वाढवेल जेवणाची चव, पाहा ही सोपी रेसिपी

Mango Pickle Recipe: कैरीचं कोरडं लोणचं वाढवेल जेवणाची चव, पाहा ही सोपी रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 25, 2023 01:37 PM IST

Summer Special Recipe: कैरीच्या लोणच्यात भरपूर तेल असते म्हणून जर तुम्ही ते खात नसाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. कैरीचे कोरडे लोणचे बनवण्यासाठी नोट करा ही रेसिपी.

कैरीचं कोरडं लोणचं
कैरीचं कोरडं लोणचं (Freepik)

Dry Mango Pickle Recipe: उन्हाळा सुरू झाला की लोकांची भूक कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी आणि तोंडाची चव सुधारण्यासाठी लोक जेवणात कैरीचा समावेश करतात. कैरीपासून तुम्ही लोणचे, पन्हं, लुंजी अशा अनेक गोष्टी सहज तयार करू शकता. या सर्व गोष्टी खायला चविष्ट तर असतातच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. जर तुम्ही कैरीचे लोणचे फक्त भरपूर तेल असल्यामुळे खाणे टाळत असाल तर ही रेसिपी तुमच्या समस्येवर उपाय ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला कमी तेलात सुक्या कैरीचे लोणचे कसे बनवायचे ते सांगणार आहोत. पोळी भाजी असो वा बटाटा किंवा कोबीचा पराठा, सोबतीला असलेले हे लोणचे चव दुप्पट करेल.

ट्रेंडिंग न्यूज

- २ टीस्पून मीठ

- १ टीस्पून हळद

मसाल्यासाठी साहित्य

- १/४ कप मोहरीचे तेल

- १ टीस्पून मीठ

- १ टीस्पून लाल तिखट

- १/४ टीस्पून हिंग

- १ टीस्पून ओवा

- २ टेबलस्पून मेथी दाणे

- २ टेबलस्पून बडीशेप

- २ टेबलस्पून बारीक वाटलेली मोहरी

Mint Drinks Recipe: पुदिनापासून बनवा देसी ड्रिंक्स, फक्त उष्णताच नाही तर ॲसिडिटीही होईल दूर

कैरीचे कोरडे लोणचे बनवण्याची पद्धत

कच्च्या कैरीचे कोरडे लोणचे बनवण्यासाठी नेहमी ताज्या कैरी वापरण्याचा प्रयत्न करा. लोणचे बनवण्यासाठी आदल्या रात्री कैरी धुवून पाण्यात भिजवावेत. दुसऱ्या दिवशी कैरी पाण्यातून बाहेर काढा. ते पुन्हा धुवा आणि कोरडे करा. नंतर त्याचे लांब लांब तुकडे करा. आता एका मोठ्या भांड्यात कैरीचे तुकडे काढून त्यात हळद आणि मीठ टाका आणि दोन्ही हातांच्या मदतीने चांगले मिक्स करा. आता या कैरी काचेच्या भांड्यात किंवा एअर टाईट डब्यात भरून ७ दिवस साठवून ठेवा. असे केल्याने कैरी थोडीशी वितळेल. मधून मधून लोणचे चमच्याने ढवळत रहा.

Bread Roll Recipe: झटपट बनवा रवा आणि बटाटाचे ब्रेड रोल, संध्याकाळसाठी आहे परफेक्ट स्नॅक्स

७ दिवसांनी लोणचे एका मोठ्या ताटात काढून उन्हात वाळवावे. आता या लोणच्याचा मसाला तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मेथी, बडीशेप, ओवा आणि मीठ घालून बारीक वाटून घ्या आणि त्यात थोडी मोहरी पूड घाला. यानंतर एका कढईत तेल टाका आणि चांगले गरम केल्यानंतर गॅस बंद करा. आता हिंग आणि इतर मसाले एकत्र करून त्यात लाल तिखट, कैरीचे तुकडे मिक्स करा आणि वरून तयार केलेला कोरडा मसाले घालून चांगले मिक्स करा. तुमचे चविष्ट कैरीचे कोरडे लोणचे तयार आहे. एअर टाइट डब्यात साठवा. तुम्ही मध्ये मध्ये हे उन्हात ठेवू शकता. तुम्ही हे लोणचे ५ ते ६ दिवस खाऊ शकता.

WhatsApp channel