Home alone safety tips for Childers: आजकाल न्यूक्लियर फॅमिली आहे. अशा कुटुंबात आई वडील आणि एखादं मुलं असते. वाढलेल्या महागाईत अनेक वेळा आई आणि वडील दोघेही काम करत असतात. याच कारणाने अनेक मुलांना घरी एकटे राहावे लागते. या स्थितीत पालकांना काय करावे समजत नाही. त्याचं पालकत्व त्यांच्यासाठी अधिक आव्हानात्मक बनते. पण अशा स्थितीत मुलांना तयार केल्यास खूप फायदा होऊ शकतो. मुलांना सुरक्षिततेच्या काही महत्त्वाच्या टिप्स शिकवणं खूप गरजेचं आहे ज्यामुळे मूल सुरक्षित राहिल. मुलांना एकटं सुरक्षित राहायला शिकवण्यासाठी पालकत्वाच्या टिप्स जाणून घेऊयात.
कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास मुलांना संपर्क साधायला शिकवा. फोन अशा ठिकाणी लिहा जिथे मुले सहज घेऊ शकतील. नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये फास्ट डायलिंगवर सेट करा. आपले नंबर सोडून मुलाचा नंबर जवळच्या विश्वासू शेजारी किंवा नातेवाईकाला द्या जेणेकरून त्यांना अडचणीच्या वेळी मदत पाठवता येईल.
मुलासाठी छान जेवून ठेवून जा. जेणेकरून त्यांना भूक लागली तर समस्या होणार नाही. तुमच्या घरात इंडक्शन ठेवा जे गॅस बर्नरपेक्षा सुरक्षित आहे. यासोबतच मुलांच्या मनोरंजनाचीही व्यवस्था असावी. कारण मुलाला त्याच्या एकटेपणाच्या विचाराने पुन्हा पुन्हा त्रास होऊ शकतो.
जर तुम्हाला तुमच्या मुलाला घरात एकटे राहू देण्याची परिस्थिती येत असेल, तर काही नियम बनवणे. मुलाला नेहमी त्यांचे पालन करण्यास सांगणे चांगले होईल. घरी एकटे असताना त्यांना कोणासाठी दार उघडावे लागेल ते सांगा. त्यांना घरात येणाऱ्या अनोळखी लोकांशी जास्त संवाद साधण्यास मनाई करा. घरात सेफ्टी डोअर लावा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या