मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Parenting Tips: बोर्डाच्या परीक्षेदरम्यान तुमच्या मुलांचं रुटीन कसं असावे? जाणून घ्या टिप्स!

Parenting Tips: बोर्डाच्या परीक्षेदरम्यान तुमच्या मुलांचं रुटीन कसं असावे? जाणून घ्या टिप्स!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 09, 2024 05:04 PM IST

Daily Routine During Board Exam: बोर्डाच्या परीक्षा लवकरच सुरु होणार आहेत. विद्यार्थी सध्या घरीच अभ्यास करत आहेत. अशावेळी हा बहुमोल वेळ मुलांनी कसा वापरायला हवा याबद्दल जाणून घ्या.

Maharashtra SSC-HSC board examination
Maharashtra SSC-HSC board examination (HT)

Board Exam Daily Routine For Students: दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसात सुरु होणार आहेत. या दोन्ही बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील फार महत्त्वाच्या परीक्षा      ( board exam preparation tips) असतात. सध्या मुलांचा पोर्शन शिकून सेल्फ स्टडीची (self study) वेळ सुरु झाली आहे. विद्यार्थी सध्या घरीच अभ्यास करत आहेत. अशावेळी जो वेळ हातात तो योग्यरीत्या वापरणे गरजेचे असते. बोर्डाच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांच्या वेळेचे योग्य व्यवस्थापन करावे लागते. अशा परिस्थितीत मुलांच्या अभ्यासापासून ते खाण्यापिण्यापर्यंत सर्व गोष्टी वेळेवर व्हायला हव्यात आणि विश्रांतीही घ्यायला हवी. विद्यार्थ्यांचे वेळेचे व्यवस्थापन (time management) जितके चांगले असेल तितके चांगले निकाल मिळतील. विद्यार्थ्यांनी या टिप्स वापरल्या तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांचा निकालही चांगला लागेल.

सकारात्मक विचार 

दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने केली कि दिवस चांगला जातो. परीक्षेच्या तयारीदरम्यान सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. यामुळे मन शांत राहते आणि आपण जे काही अभ्यास करतो ते लक्षात राहते.

वेळेचे मॅनेजमेंट

परीक्षेच्या काळात वेळेचे मॅनेजमेंट खूप महत्त्वाचे असते. सकाळी उठल्यापासून व्यायाम, खाणे, अभ्यास, विश्रांती आणि चांगली झोप या सर्व गोष्टी वेळेवर करायला हव्यात. अभ्यासाच्या वेळेशी कोणतीही तडजोड करूच नये यासोबत विद्यार्थ्यांनी विश्रांतीही घेणे गरजेचे आहे.

वेळापत्रकानुसार अभ्यास करा

परीक्षेत येणारे सर्व विषय व त्यांचे विषय यानुसार वेळापत्रक बनवा आणि त्याला फॉलो करा. विषयाला त्याच्या वेटेजनुसार वेळ द्या. तुम्ही कोणत्याही विषयात कमी पडत असाल तर त्याकडे अधिक लक्ष द्या.

हेल्दी आहार

विद्यार्थ्यांना हेल्दी आहार द्या. अन्नामध्ये पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. त्यांनी हिरव्या भाज्या, फळे खावीत, ज्यूस प्यावे आणि जंक फूड खाऊ नये. जास्त जड अन्न खायला देऊ नका, त्यामुळे आळस आणि झोप येते.

चांगली झोप आहे गरजेची

नेहमी लक्षात ठेवा परीक्षेच्या वेळी चांगली झोप घेणे खूप गरजेचे आहे. यामुळे मानसिक आरोग्य सुधारते आणि तणाव कमी करते. चांगली झोप तुमची स्मरणशक्ती मजबूत करते, जी परीक्षेच्या दिवशी तुमच्यासाठी फायदेशीर असते. झोप पूर्ण झाल्यास परीक्षेत लक्ष विचलित होणार नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel