मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Parenting Tips: या सवयी मुलांच्या १० वर्षाच्या आतमध्ये लावा, मिळतील अनेक फायदे!

Parenting Tips: या सवयी मुलांच्या १० वर्षाच्या आतमध्ये लावा, मिळतील अनेक फायदे!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 13, 2023 10:01 PM IST

Best Habits for Childers: मुलाच्या भविष्याचा पाया लहानपणापासूनच घातला जातो. त्या चांगल्या सवयी मुलांचे भवितव्य तर सुधारतीलच शिवाय ते एक चांगला माणूस बनतील.

Child Care
Child Care (Freepik)

Parenting Tips: आजकाल, लाइफस्टाइल बदलेली आहे. सगळेच फार व्यस्त झाले आहेत. यामुळे पालक सहसा आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाहीयेत. विशेषत: मेट्रो शहरांमध्ये जिथे पालक दोघेही काम करत असतात ते मुलांना जास्त वेळ देऊ शकत नाही. यामुळे मुलाच्या संगोपनातील फरक जाणवतो. मुलांचं संगोपन पालकांसाठी एक आव्हान बनले आहे. पालकांनी वेळ दिला नाही तर मुलं त्यांचा जास्तीत जास्त वेळ मोबाईल आणि लॅपटॉपवर घालवतात. काही गोष्टी अशा असतात ज्या त्यांच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी चांगल्या नाहीत. यामुळेच लहानपणीच मुलांना काही गोष्टी शिकवायला हव्यात.

ट्रेंडिंग न्यूज

या गोष्टी शिकवा

> मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल सांगण्यासाठी १० हे योग्य वय आहे.

> यासोबतच त्या वयातील मुलांना वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छतेबाबत सांगितले पाहिजे. तसेच मुलांना हात धुणे आणि शरीर स्वच्छ ठेवण्याबाबत माहिती द्या.

> शरीरात होत असलेल्या बदलांबद्दल मुलांना जरूर सांगा.

> मुलांसाठी योग्य मित्र निवडणे देखील खूप महत्वाचे आहे, मित्र खूप मोठी भूमिका बजावतात, अशा परिस्थितीत मुलांना सांगितले पाहिजे की त्यांनी नेहमी चांगले मित्र बनवावे.

> या वयात पालक आपल्या मुलांना चांगले गुण मिळवून देण्यावर भर देतात, त्यामुळे अनेक वेळा मुले तणावाखाली राहू लागतात. अशा स्थितीत १० वर्षापर्यंतच्या मुलांना इयत्तांसह ज्ञान संपादन करायला शिकवले पाहिजे.

> सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना प्रत्येकाचा आदर करायला शिकवणे. असे केल्याने ते चांगले वागायला शिकतील.

> अनेक वेळा पालक आपल्या मुलांना काहीतरी समजावून सांगण्यासाठी त्यांना खडसावतात, परंतु मुलांना राग न ठेवता प्रेमाने समजावून सांगा. यानंतरही जर मुलाला तुम्ही काय म्हणत आहात ते समजत नसेल तर योग्य उदाहरण देऊन मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.

> मुलांना निरोगी पदार्थ खायला शिकवा. त्यांना जीवनसत्त्वे आणि खनिजे आणि आपल्या शरीरासाठी निरोगी अन्न किती महत्त्वाचे आहे ते सांगा. लहानपणापासून मुलांना कमी फास्ट फूड खायला द्या. त्यापेक्षा त्यांना सूप, फळे आणि भाज्या खाण्याची सवय लावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग