Lifestyle Stories 20th April: ईदची तयारी ते समर केअर! वाचा आजच्या टॉप लाइफस्टाइल स्टोरीज-health travel beauty summer care eid know top latest trending todays 20 april news ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Lifestyle Stories 20th April: ईदची तयारी ते समर केअर! वाचा आजच्या टॉप लाइफस्टाइल स्टोरीज

Lifestyle Stories 20th April: ईदची तयारी ते समर केअर! वाचा आजच्या टॉप लाइफस्टाइल स्टोरीज

Apr 20, 2023 10:39 PM IST

जाणून घ्या आरोग्य, सौंदर्य, रेसिपी अशा विविध विषयावरच्या लाइफस्टाइल सेक्शनमधील आजच्या टॉप स्टोरीज...

Lifestyle news in Marathi
Lifestyle news in Marathi (Freepik)

रमजानच्या पवित्र महिन्यानंतर ईदचा सण येणार आहे. त्यामुळे त्याची तयारी जोरात सुरु आहे. यासोबत गरमीचा पारा वाढला आहे. त्यामुळे आपल्याला आरोग्याची आणि स्किनची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. याशिवाय तुम्ही फूड, प्रवास, सौंदर्य आणि आरोग्याशी संबंधित इतर टॉप लाइफस्टाइल बातम्याही जाणून घ्या.

Eid Recipe: शिरखुर्माने वाढवा ईदचा गोडवा, सोपी आहे बनवण्याची पद्धत

रमजानच्या पवित्र महिन्यानंतर ईदचा सण येणार आहे. या विशेष दिवशी विविध पदार्थ तयार केले जातात. तुम्हालाही या ईदला काहीतरी गोड बनवायचे असेल तर तुम्ही शिरखुर्मा बनवू शकता. शिरखुर्मा हा ईदच्या दिवशी बनवला जाणारा चविष्ट पदार्थ आहे, जो सर्वांना आवडतो. ते कसे बनवायचे ते जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Heat in Pregnancy: प्रेग्नेंसीमध्ये महिलांना जास्त गरम का होते? या उन्हाळ्यात स्वतःला थंड कसे ठेवावे?

महिलांसाठी गर्भधारणेची वेळ पूर्णपणे वेगळी असते. या दरम्यान शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे त्यांना रोज नवनव्या अनुभवातून जावे लागते. या शारीरिक अनुभवांमध्ये गरम वाटणे समाविष्ट आहे. वास्तविक महिलांना सामान्य दिवसांपेक्षा गरोदरपणात जास्त उष्णता जाणवते. अशा परिस्थितीत या उन्हाच्या लाटेच्या दिवसात आणि उन्हाळ्याच्या दिवसात त्यांनी स्वतःला थंड ठेवण्यासाठी काय करावे आणि शेवटी एवढी उष्णता जाणवण्याचे कारण काय? याबद्दल इथे क्लिक करून अधिक जाणून घ्या.

स्‍नायूंचे आरोग्‍य का महत्त्वाचे आहे? त्याचा रोगप्रतिकारशक्‍तीवर कसा परिणाम होतो? जाणून घ्या तज्ञांकडून

आजच्‍या धावपळीच्‍या जगात आपल्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष करतो. पण, वाढत्या शाररिक समस्या बघता आपले आरोग्‍य उत्तम राखणे आणि रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ असणे अत्‍यंत महत्त्वाचे बनले आहे. रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी कोणतीही जादुई गोळी नाही. अॅबॉटच्‍या न्‍यूट्रिशन व्‍यवसायामधील मेडिकल व सायण्टिफिक अफेअर्सचे प्रमुख डॉ. इरफान शेख स्‍नायूंचे आरोग्‍य का महत्त्वाचे आहे आणि स्‍नायू शक्तिशाली असल्‍याने रोगप्रतिकाशक्‍ती कशाप्रकारे वाढू शकते याबाबत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

De Tan Pack: उन्हामुळे खराब झाला चेहऱ्याचा रंग? महागडे फेशियल नव्हे तर लावा हा डी-टॅन पॅक

उन्हाळ्यात त्वचेच्या टॅनिंगमुळे चेहऱ्याचा आणि हात-पायांचा रंग बदलू लागतो. प्रत्येकाला या समस्येचा सामना करावा लागतो. जेव्हा उन्हामुळे त्वचेचा टोन खराब होतो तेव्हा त्याला टॅनिंग म्हणतात. त्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक लपते आणि चेहऱ्यावर काळे डाग दिसू लागतात. याला सामोरे जाण्यासाठी महिला पार्लरमध्ये महागडे फेशियल करतात. पण तुम्ही घरच्या घरी सुद्धा यापासून सुटका मिळवू शकता. टॅनिंग दूर करण्यासाठी घरगुती डी टॅन फेस पॅक देखील उपयुक्त ठरू शकतात. हा डी टॅन पॅक कसा बनवायचा ते इथे क्लिक करून जाणून घ्या.

Eid 2023: मुलांनो ईदला स्टयलिश दिसण्यासाठी फॉलो करा या स्टाइलिंग टिप्स!

ईदच्या सणाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. मुस्लिम समाज हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी विविध स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. यावेळी लोक नवीन कपडे घालतात. तुम्हीही हा सण अतिशय स्टायलिश पद्धतीने साजरा करू शकता. पुरुषांसाठी काही स्टायलिंग टिप्स घेऊन आलो आहोत. ईदच्या दिवशी तुम्ही कोणत्या प्रकारचे आउटफिट्स घालावे हे तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही या बॉलीवूड कलाकारांच्या लूकपासून प्रेरणा घेऊ शकता. या ईदमध्ये तुम्ही हे ट्रेंडी आणि लेटेस्ट डिझाइनचे कपडे ट्राय करू शकता ते जाणून इथे क्लिक करून जाणून घ्या.

Whats_app_banner
विभाग