मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  स्‍नायूंचे आरोग्‍य का महत्त्वाचे आहे? त्याचा रोगप्रतिकारशक्‍तीवर कसा परिणाम होतो? जाणून घ्या तज्ञांकडून

स्‍नायूंचे आरोग्‍य का महत्त्वाचे आहे? त्याचा रोगप्रतिकारशक्‍तीवर कसा परिणाम होतो? जाणून घ्या तज्ञांकडून

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Apr 20, 2023 08:48 AM IST

आजच्‍या धावपळीच्‍या जगात आपल्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष करतो. पण, वाढत्या शाररिक समस्या बघता आपले आरोग्‍य उत्तम राखणे आणि रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ असणे अत्‍यंत महत्त्वाचे बनले आहे.

Health Care
Health Care (Freepik )

रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी कोणतीही जादुई गोळी नाही. अॅबॉटच्‍या न्‍यूट्रिशन व्‍यवसायामधील मेडिकल व सायण्टिफिक अफेअर्सचे प्रमुख डॉ. इरफान शेख स्‍नायूंचे आरोग्‍य का महत्त्वाचे आहे आणि स्‍नायू शक्तिशाली असल्‍याने रोगप्रतिकाशक्‍ती कशाप्रकारे वाढू शकते याबाबत सांगत आहेत. स्‍नायू उत्तम आरोग्‍यासाठी महत्त्वाचे आहेत. स्‍नायूंमुळे आपल्‍याला हालचाल करण्‍यास आणि संतुलन राखण्‍ययास मदत होते. खरेतर, ते तुमची शक्‍ती कायम राहण्‍यास मदत करण्‍यासोबत खेळ खेळणे, नृत्‍य करणे, कुत्र्यासोबत चालायला जाणे अशा कृतीं करण्‍याच्‍या तुमच्‍या क्षमतेला पाठबळ देखील देतात. स्‍नायू रोगप्रतिकार पेशी कार्यान्वित करण्‍यामध्‍ये देखील महत्वाची भूमिका बजावतात. स्‍नायू उती रोगप्रतिकारशक्‍तीला कार्य करण्‍यास आवश्‍यक असलेली ऊर्जा व अॅमिनो आम्‍ल देण्‍यासोबत आपले संसर्गापासून संरक्षण देखील करतात. स्‍नायू तुम्‍ही बरे होत असताना शक्‍ती व ऊर्जेचा महत्त्वपूर्ण स्रोत देखील तयार करतात. तुम्‍ही आजारी असताना किंवा हॉस्पिटलमध्‍ये भरती असताना आणि शरीराला बरे होण्‍यासाठी आवश्‍यक असलेले पौष्टिक घटक मिळत नसताना शरीर त्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी स्‍नायू उतींचे नैसर्गिकरित्‍या विघटन करते.

खराब स्नायूंच्या आरोग्यामुळे चालणे किंवा खाणे यांसारख्या दैनंदिन क्रियांसह अगदी लहान क्रिया करत राहण्‍याच्‍या व्यक्तीच्या क्षमतेवर हळूहळू परिणाम होऊ शकतो. आज उपलब्ध असलेल्या संशोधनाचा विचार करता वृद्धत्वामुळे स्नायूंची झीज होऊ शकते – उदाहरणार्थ, वयाच्या ४०व्या वर्षापासून, प्रौढ व्‍यक्‍तींची स्‍नायूशक्‍ती दर दशकाला ८ टक्‍क्‍यांनी कमी होते आणि वयाच्‍या ७०व्‍या वर्षानंतर हा दर दुप्‍पट होऊ शकतो. आरोग्‍यदायी राहण्‍यासाठी स्‍नायूंचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यासोबत अधिक शक्तिशाली करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे.

स्‍नायू मजबूत बनवणे

स्‍नायूशक्‍ती कमी होणे नैसर्गिक आहे, पण त्‍याचा बांधणी दर आणि नकारात्‍मक परिणामांकडे दुर्लक्ष करू नये, कारण रोगप्रतिकारशक्‍तीचे आरोग्‍य स्‍नायूंच्‍या आरोग्‍यावर अवलंबून असते. तुमच्‍या स्‍नायूशक्‍तीची तपासणी करण्‍यासाठी चेअर चॅलेंज टेस्‍ट सोपा मार्ग आहे. अंदाजे ४३ सेमी (१.४ फूट) उंची असलेल्‍या खुर्चीवर ५ सिट-अप्‍स करण्‍यासाठी लागणरा कालावधी तुम्‍हाला तुमच्‍या स्‍नायूशक्‍तीबाबत माहिती देऊ शकतो. स्‍नायूशक्‍तीबाबत सर्वोत्तम माहितीसाठी https://muscleagetest.in/ या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. स्‍नायूशक्‍ती वाढवता येऊ शकेल असे ३ सोपे मार्ग पुढीलप्रमाणे:

१. शारीरिक व्‍यायामासाठी वेळ काढा: नियमित शारीरिक व्‍यायामाचा स्‍नायूशक्‍ती मजबूत करण्‍याकरिता दीर्घकाळापर्यंत फायदा होऊ शकतो. तुम्‍ही तुमच्‍या दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये चालणे, पोहणे, सायकल चालवणे, जॉगिंग किंवा पायऱ्या चढणे यांसारख्‍या साध्‍या कृतींचा समावेश करत सुरूवात करू शकता. तसेच तुम्‍ही वजन उचलण्‍याचा आणि हळूहळू त्‍यामध्‍ये अधिक वजन वाढवण्‍याचा आणि काळासह हा व्‍यायाम वारंवार करण्‍याचा प्रयत्‍न करू शकता किंवा स्‍ट्रेच बॅण्‍डसह व्‍यायाम करू शकता. नियमितपणे फक्‍त एक तास शारीरिक व्‍यायाम केल्‍यास स्‍नायूशक्‍ती आणि एकूण आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍याला उत्तम मदत होऊ शकते. यामुळे संसर्गाविरोधात लढण्‍याची आणि घातक जीवाणूंना प्रभावीपणे नष्‍ट करण्‍याची शरीराची क्षमता देखील वाढू शकते.

२. दैनंदिन प्रथिने गरजांची पूर्तता करा: प्रथिने स्‍नायूशक्‍ती मजबूत करण्‍यासाठी आवश्‍यक आहेत आणि दररोज पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. प्रतिभोजन २५ ते ३० ग्रॅम प्रथिनांचे सेवन स्‍नायूशक्‍तीची निर्मिती आणि उती दुरूसतीसाठी शरीराकरिता सानुकूल आहे. तुम्‍ही लीन मांस, पोल्‍ट्री, मासे, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, टोफू आणि बीन्स यांसारख्या अनेक स्त्रोतांच्‍या माध्‍यमातून प्रथिने मिळवू शकता.

३. पौष्टिक घटकांची पूर्तता करा: चांगले पोषण आणि स्नायूंचे आरोग्य या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. अखेर अन्नातूनच तर आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जा मिळते आणि स्नायूंना ताकद मिळते. यासाठी प्रथिनांसह कॅल्शियम व जीवनसत्व ड असलेला आहार सेवन करणे महत्त्वाचे आहे. स्‍नायूशक्‍ती वाढवण्‍यासाठी प्रथिनांव्‍यतिरिक्‍त तुम्‍ही हिरव्‍या पालेभाज्‍या, दुग्‍धजन्‍य उत्‍पादने, मासे, मशरूम्‍स व सोयाबीन यांचे देखील सेवन करू शकता.

तसेच, स्‍नायूशक्‍ती वाढवण्‍यासाठी शरीराला बीटा-हायड्रॉक्‍सी-बीटा-मीथाइलबुट्रायरेट (एचएमबी)ची गरज असते, जे शरीर विशिष्ट अमिनो आम्‍लांचे विघटन करते तेव्‍हा नैसर्गिकरित्‍या निर्माण होते. तुम्‍ही याचे प्रमाण कमी असलेले अॅवोकॅडो, द्राक्षे व फुलकोबी यांचे सेवन करू शकता, तसेच तुम्‍ही सप्‍लीमेंट्सचा देखील वापर करू शकता जसे एन्‍शुअर एचएमबी, जे ३२ आवश्‍यक पौष्टिक घटक देते, ज्‍यामुळे स्‍नायूशक्‍ती वाढवण्‍यामध्‍ये मदत होऊ शकते.

शरीराची ताकद आणि आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण व समाधानी बनविणारी दैनंदिन कामे करण्याची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी स्नायू आरोग्‍यदायी असणे अत्यंत महत्त्वाचे असते. स्‍नायू व रोगप्रतिकारशक्‍ती आरोग्‍याला पुरेसा पाठिंबा देणे नेहमीच सोपे नसते, पण योग्‍य पोषण व व्‍यायामाच्‍या संतुलनासह आरोग्‍यदायी जीवनशैली निर्माण करण्‍याप्रती मेहनत घेतल्‍यास स्‍नायूंचे उत्तम आरोग्‍य राखता येऊ शकते.

WhatsApp channel

विभाग