मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Mens Fashion Tips For Eid 2023

Eid 2023: मुलांनो ईदला स्टयलिश दिसण्यासाठी फॉलो करा या स्टाइलिंग टिप्स!

Fashion
Fashion (Instagram )
Tejashree Tanaji Gaikwad • HT Marathi
Apr 19, 2023 01:20 PM IST

Men's Fashion: लवकरच ईदचं सेलिब्रेशन केलं जाणार आहे. यानिमित्ताने खास तयारी केली जाते. म्हणूनच खास मुलांसाठी घेऊन आलोय स्टायलिंग टिप्स.

ईदच्या सणाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. मुस्लिम समाज हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी विविध स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. यावेळी लोक नवीन कपडे घालतात. तुम्हीही हा सण अतिशय स्टायलिश पद्धतीने साजरा करू शकता. पुरुषांसाठी काही स्टायलिंग टिप्स घेऊन आलो आहोत. ईदच्या दिवशी तुम्ही कोणत्या प्रकारचे आउटफिट्स घालावे हे तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही या बॉलीवूड कलाकारांच्या लूकपासून प्रेरणा घेऊ शकता. या ईदमध्ये तुम्ही हे ट्रेंडी आणि लेटेस्ट डिझाइनचे कपडे जरूर ट्राय करून पहा.

ट्रेंडिंग न्यूज

सिद्धार्थ मल्होत्रा

सिद्धार्थ मल्होत्राने अतिशय सुंदर पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजामा घातला आहे. यासोबत अभिनेत्याने अतिशय सुंदर फुलांचा दुपट्टा परिधान केला आहे. बहुरंगी दुपट्टा सिद्धार्थला खूप सूट करतो. हा रंग उन्हाळ्यासाठी योग्य आहे. कुर्ता पायजमा या प्रकारात तुम्हाला स्टायलिश लुक मिळेल.

शाहिद कपूर

या फोटोंमध्ये शाहिद कपूरने अतिशय सुंदर पारंपरिक कुर्ता घातला आहे. पर्पल कलरच्या कुर्त्यात एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. शाहिदने हा कुर्ता काळ्या पँटसोबत परिधान केला आहे. सोबत प्रिंटेड बेज दुपट्टाही घातला आहे. काळ्या शूजसह हा लूक पूर्ण केला आहे.

विकी कौशल

तुम्ही विकी कौशल सारखा नेव्ही ब्लू कुर्ता देखील घालू शकता. त्यासोबत व्हॅनिला ब्रीच पँट घातली जाते. त्याच रंगाचे जाकीट त्याच्यासोबत पेअर केले आहे. त्यावर भरतकाम केलेले आहे. लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्याने काळे शूज घातले आहे.

कार्तिक आर्यन

ईदच्या निमित्ताने तुम्ही कार्तिक आर्यनसारखा आलिशान कुर्ता पायजमाही घालू शकता. हा क्लासिक पांढरा कुर्ता पायजमा घालून तुम्ही ईद पार्टीची शान व्हाल. कार्तिकने यासोबत एक लांब जॅकेट परिधान केले आहे.

रणवीर सिंग

रणवीर सिंगने पांढरा कुर्ता आणि चुरीदार सेट परिधान केला आहे. त्याच्यासोबत गडद रंगाचे जॅकेट पेअर केले आहे. या फोटोंमध्ये अभिनेता सुंदर पोज देताना दिसत आहे.

WhatsApp channel