मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Heat in Pregnancy: प्रेग्नेंसीमध्ये महिलांना जास्त गरम का होते? या उन्हाळ्यात स्वतःला थंड कसे ठेवावे?

Heat in Pregnancy: प्रेग्नेंसीमध्ये महिलांना जास्त गरम का होते? या उन्हाळ्यात स्वतःला थंड कसे ठेवावे?

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 20, 2023 07:00 PM IST

Hot Flashes in Pregnancy: गरोदरपणात महिलांना सामान्य महिलांपेक्षा जास्त उष्णता जाणवते. मग या कडक उन्हात ती गरम हवेच्या दुष्परिणामांपासून स्वतःला कसे वाचवणार? जाणून घ्या.

प्रेग्नेंसीमध्ये स्वतःला थंड ठेवण्यासाठी टिप्स

Heatwave Precaution and Tips for Pregnant Woman: महिलांसाठी गर्भधारणेची वेळ पूर्णपणे वेगळी असते. या दरम्यान शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे त्यांना रोज नवनव्या अनुभवातून जावे लागते. या शारीरिक अनुभवांमध्ये गरम वाटणे समाविष्ट आहे. वास्तविक महिलांना सामान्य दिवसांपेक्षा गरोदरपणात जास्त उष्णता जाणवते. अशा परिस्थितीत या उन्हाच्या लाटेच्या दिवसात आणि उन्हाळ्याच्या दिवसात त्यांनी स्वतःला थंड ठेवण्यासाठी काय करावे आणि शेवटी एवढी उष्णता जाणवण्याचे कारण काय? कारण अति उष्णतेमुळे म्हणजेच गरम हवेमुळे महिलांमध्ये प्री टर्म डिलीवरीची समस्या उद्भवते. त्याच वेळी बाळाचे वजन देखील बरेच कमी होते आणि आरोग्याचे नुकसान होते.

Yoga Mantra: गरोदरपणात योग करताना लक्षात ठेवा या गोष्टी, होणार नाही कोणताही त्रास

प्रेग्नेंसीमध्ये सामान्यपेक्षा जास्त उष्ण वाटण्यास ही कारणं असतात कारणीभूत

- गरोदरपणात महिलांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्ताच्या नसा पृष्ठभागावर पसरतात. त्यामुळे जास्त गरम होते.

- त्याच वेळी इस्ट्रोजेन नावाच्या हार्मोनमध्ये चढ-उतार झाल्यामुळे गर्भवती महिलांना सामान्य स्त्रियांपेक्षा जास्त गरम वाटते.

- गर्भवती महिलांना तिसऱ्या तिमाहीत उष्माघात होण्याची शक्यता असते. कारण चयापचय गती वाढते. त्यामुळे शरीराचे तापमान वाढू लागते आणि उष्णता जाणवते.

- अनेक महिलांमध्ये पाणी कमी प्यायल्याने हॉट फ्लॅशेसची समस्या सुरू होते.

- तिसऱ्या तिमाहीत बाळामुळे वजन झपाट्याने वाढते. अशा स्थितीत उष्णता जास्त जाणवते.

Pregnancy Tips: पीरियड मिस झाल्यानंतर प्रेग्नेंसी कळेपर्यंत किती मोठे होते गर्भात वाढणारे बाळ?

प्रेग्नेंसी मध्ये अशा प्रकारे कमी करा उष्णतेचा प्रभाव

- शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. भरपूर पाणी घ्या.

- तसेच नारळ पाणी, लस्सी, ताक, ताज्या फळांचा रस असे द्रव प्या. हे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करेल. ज्यामुळे शरीराचे तापमान सामान्य होण्यास मदत होईल.

- गरोदरपणात चहा आणि कॉफीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः उन्हाळ्यात हे लक्षात ठेवा.

- तणाव आणि स्ट्रेस अजिबात होऊ देऊ नका. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करा. हे शरीराचे तापमान सामान्य करण्यास मदत करेल.

- उन्हाळ्यात गर्भवती महिलांचे बीपीही वाढू शकते. अशा परिस्थितीत वेळोवेळी बीपी तपासत राहा. जेणेकरून अति उष्णतेचे कारण कळून ते दूर करता येईल.

- नेहमी सैल आणि सुती कपडे घालण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून शरीराचे तापमान वाढू नये.

- मोकळ्या आणि थंड ठिकाणी बसा. गरम ठिकाणी थेट उन्हात जाणे टाळा.

- जर तुम्हाला खूप गरम वाटत असेल तर कापड थंड पाण्यात भिजवावे आणि हात पाय आणि बाकीचे शरीर पुसून टाकावे. त्यामुळे गरमीपासूनही दिलासा मिळेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग