मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pregnancy Tips: पीरियड मिस झाल्यानंतर प्रेग्नेंसी कळेपर्यंत किती मोठे होते गर्भात वाढणारे बाळ?

Pregnancy Tips: पीरियड मिस झाल्यानंतर प्रेग्नेंसी कळेपर्यंत किती मोठे होते गर्भात वाढणारे बाळ?

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 06, 2023 10:07 PM IST

बहुतेक लोक पीरियड मिस झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात प्रेग्नेंसीची टेस्ट करतात. मासिक पाळीचे सामान्य चक्र २८-३४ दिवसांचे असते. मासिक पाळी मिस झाल्यानंतर पहिल्या आठवड्यानंतरच गर्भधारणा चाचणी केली जाते.

प्रेग्नेंसी टिप्स
प्रेग्नेंसी टिप्स (unsplash)

Fetal Growth Development: गरोदरपणाचा प्रत्येक आठवडा खूप खास असतो. विशेषत: पहिल्या सहा महिन्यांत दर आठवड्याला गर्भात वाढणाऱ्या बाळाचा विकास होतो. अनेकदा महिलांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, कंसिव्ह केल्यानंतर कधीपर्यंत बाळ आकार घेते. बहुतेक लोक पीरियड्स मिस झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात प्रेग्नेंट असल्याचे तपासतात. मासिक पाळीचे सामान्य चक्र २८-३४ दिवसांचे असते. मासिक पाळी चुकल्यानंतर पहिल्या आठवड्यानंतरच प्रेग्नेंसी टेस्ट केली जाते. तोपर्यंत सहावा आठवडा लागतो आणि गर्भधारणा पूर्ण सहा आठवडे म्हणून गणली जाते. या वेळेस गर्भातील बाळ सहा आठवड्यांचे होऊ लागते. त्याच वेळी त्याचे शरीर आकार घेऊ लागते.

एवढे मोठे असते भ्रुण

या वेळेस गर्भातील गर्भाची लांबी १/८ किंवा १/४ इंच असते. म्हणजे बाळ गर्भात डाळिंबाच्या दाण्याइतके मोठे असते. पण या काळात त्याचे हात, पाय, कान तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर अंतर्गत अवयवही मेंदू, फुफ्फुसे आणि इतर अवयव तयार करण्यास सुरवात करतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गरोदरपणाच्या सहाव्या आठवड्यात बाळाच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येतात. त्यासाठी वजाइनल अल्ट्रासाऊंड करावे लागते. ज्यामध्ये बाळाच्या हृदयाचे ठोके ओळखले जातात.

हे अवयव तयार होऊ लागतात

सहावा आठवडा संपताच, गर्भातील बाळाचे मेंदू आणि मज्जासंस्था वेगाने तयार होते. डोक्याच्या दोन्ही बाजूंनी डोळे बनवण्याची आणि कान तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याच वेळी, पचनसंस्था आणि श्वसन प्रणाली देखील तयार होऊ लागते. गर्भात बाळ सी-शेप मध्ये असते.

आईला करावे लागते हे काम

गर्भधारणा समजल्यानंतर डॉक्टर आईला अनेक तपासण्या लिहून देतात. ज्याची चाचणी आवश्यक आहे. यामध्ये लोह चाचणी, लैंगिक संक्रमित रोगांची चाचणी, ग्लुकोज चाचणी यांचा समावेश आहे. जेणेकरून रोग शोधून त्यावर नियंत्रण ठेवता येईल. फॉलिक अॅसिड आणि मल्टीविटामिन सप्लिमेंट्स गरोदरपणाच्या सुरुवातीच्या आठवड्यापासून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुरू कराव्यात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग