मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: गरोदरपणात योग करताना लक्षात ठेवा या गोष्टी, होणार नाही कोणताही त्रास

Yoga Mantra: गरोदरपणात योग करताना लक्षात ठेवा या गोष्टी, होणार नाही कोणताही त्रास

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 07, 2023 08:50 AM IST

Pregnancy Tips: प्रेग्नेंसीमध्ये योगा करण्याचा सल्ला अनेक जण देतात. पण हे करताना आईने काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

प्रेग्नेंसीमध्ये योगा करताना घ्यावयाची काळजी
प्रेग्नेंसीमध्ये योगा करताना घ्यावयाची काळजी

Yoga in Pregnancy: गरोदरपणात कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा आईसोबतच गर्भातील बाळासाठीही घातक ठरू शकतो. या स्थितीत शरीराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अशा वेळी महिलांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहणे आवश्यक आहे. डॉक्टर प्रेग्नेंट महिलांना त्यांच्या आहाराची काळजी घेण्यासोबतच हलका व्यायाम करण्याचा सल्लाही देतात. कारण हाच काळ असतो जेव्हा शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. यासाठी गरोदर महिलांनी रोज काही सोपे योगासने करणे आवश्यक आहे. गरोदरपणात योगा केल्याने आई आणि मूल दोघेही निरोगी राहतात. एवढेच नाही तर योगासने केल्याने बाळाच्या जन्मादरम्यान येणाऱ्या समस्याही बऱ्याच अंशी कमी होतात. अशा परिस्थितीत योग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गरोदरपणात योगाभ्यास करताना लक्षात ठेवा या गोष्टी

- प्रेग्नेंसी मध्ये अनेकदा महिलांना मळमळ किंवा अस्वस्थता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा स्थितीत जर

तुम्ही बंद खोलीत किंवा छोट्या ठिकाणी योगासने करत असाल तर ते टाळावे. हवेशीर जागा निवडा.

- गरोदरपणात योगा करताना योग्य कपडे निवडा. आजकाल अशा ट्रॅक पँट्स येतात, ज्यामुळे पोटाला थोडासा आधार मिळतो. ते घालून योगासने करणे आरामदायक आहे.

- गर्भवती महिलांनी रिकाम्या पोटी योगा करू नये. त्याचबरोबर जेवल्यानंतर लगेच योगाभ्यास करू नये. हलके काही खाल्ल्यानंतर तुम्ही योगा करू शकता.

- गर्भवती महिलेने योगाभ्यास करताना कोणताही प्रयोग करू नये. तज्ञांनी सांगितल्या प्रमाणे करावे.

- योगासने करताना शरीराची काळजी घेतली पाहिजे. जास्त वेळ योगाभ्यास केल्याने समस्या निर्माण होऊ शकतात.

- गर्भावस्थेच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत योगाभ्यास करताना स्त्रीची साखरेची पातळी अनेकदा खाली जाते. ज्यामुळे चक्कर येणे किंवा थकवा येऊ लागतो. अशा स्थितीत कार्बोहायड्रेट पदार्थसोबत ठेवा. आपल्यासोबत पाणी आणि लिंबूपाणी जरूर ठेवा.

 

- पोटावर दबाव आणणारी आणि पोटात ताण निर्माण करणारी आसने गर्भधारणे दरम्यान करू नयेत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग