मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Grey Hair: पांढरे केस काळे करायचे? मोहरीच्या तेलात मिक्स करून लावा या २ गोष्टी

Grey Hair: पांढरे केस काळे करायचे? मोहरीच्या तेलात मिक्स करून लावा या २ गोष्टी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 25, 2023 11:22 AM IST

Natural Remedies for Hair: तुमचे केसही कमी वयात पांढरे झाले असतील तर ते कलर करण्यापेक्षा मोहरीच्या तेलात या दोन गोष्टी मिक्स करून लावा. केस नैसर्गिकरित्या काळे होऊ लागतील.

पांढरे केस काळे करण्यासाठी नॅचरल पद्धत
पांढरे केस काळे करण्यासाठी नॅचरल पद्धत

Mustard Oil for Grey Hair: आजकाल केस पांढरे होणे अगदी सामान्य झाले आहे. कमी वयात केस गळणे आणि कमकुवत होण्यासोबतच केस पांढरे होत आहेत. हे पांढरे केस काळे करण्यासाठी अनेकदा लोक हेअर कलरचा वापर करतात. त्यामुळे केस लवकर पांढरे होतात. केस नैसर्गिकरित्या काळे करायचे असतील तर या दोन गोष्टी मोहरीच्या तेलात मिक्स करून लावा. त्यामुळे केस सहज काळे होतात.

ट्रेंडिंग न्यूज

Hair Fall: केसांना अशा प्रकारे लावा पेरूची पाने, हेअर फॉलची समस्या होईल दूर

केसांना मोहरीच्या तेलासोबत लावा या दोन गोष्टी

जर तुम्हाला केस नैसर्गिकरित्या काळे करायचे असतील तर शुद्ध मोहरीच्या तेलात मेथी दाणे आणि सुका आवळा मिक्स करा. जर तुमच्याकडे शुद्ध मोहरीचे तेल नसेल तर खोबरेल तेल देखील वापरता येते.

Carrot for Hair: केसांवर जादूसारखं काम करते गाजर, अशा प्रकारे लावल्यास दिसेल इन्स्टंट रिझल्ट

केसांना काळे करणारे नैसर्गिक तेल कसे बनवायचे

सर्वप्रथम सुक्या आवळ्याला मिक्सरमध्ये किंवा खलबत्यात कुटून घ्या. तसेच मेथीचे दाणे सुद्धा खलबत्यात कुटून घ्या. आता या दोन्ही गोष्टी मोहरीच्या तेलात मिक्स करून ठेवा. साधारण दहा ते पंधरा दिवसांनी हे तेल लोखंडी कढईत टाकून शिजवावे.

कसे लावावे हे तेल

जर तुम्हाला तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे करायचे असतील तर रोज रात्री हे तेल केसांना लावा आणि झोपा. दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा. केस काही दिवसात मजबूत आणि दाट होतील. यासोबतच केसांचा रंगही बदलू लागतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग