मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Fall: केसांना अशा प्रकारे लावा पेरूची पाने, हेअर फॉलची समस्या होईल दूर

Hair Fall: केसांना अशा प्रकारे लावा पेरूची पाने, हेअर फॉलची समस्या होईल दूर

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 18, 2023 12:48 PM IST

Hair Care With Guava Leaves: पेरूमध्ये संत्र्यापेक्षा चारपट जास्त व्हिटॅमिन सी असते हे तुम्हाला माहित नसेल. पेरूची पाने केस गळती रोखण्यासाठी मदत करू शकतात. ते कसे वापरावे जाणून घेऊया.

हेअर फॉल कमी करण्यासाठी पेरूची पाने
हेअर फॉल कमी करण्यासाठी पेरूची पाने

Guava Leaves For Hair Fall: जर तुम्हीही तुमच्या गळणाऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त आहात का? काळजी करु नका. पेरूची पाने तुम्हाला ही समस्या सोडवण्यासाठी मदत करू शकतात. होय पेरूच्या पानांमध्ये असे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, जे केस गळण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात. पेरूमध्ये संत्र्यापेक्षा चारपट जास्त व्हिटॅमिन सी असते, हे तुम्हाला क्वचितच माहित असेल. जे केस गळती रोखण्यासाठी मदत करू शकतात. केस गळणे थांबवण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर कसा करावा हे जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

Carrot for Hair: केसांवर जादूसारखं काम करते गाजर, अशा प्रकारे लावल्यास दिसेल इन्स्टंट रिझल्ट

हेअर फॉल थांबवण्यासाठी पेरूच्या पानांचा अशा प्रकारे वापर करा

केस गळणे टाळण्यासाठी प्रथम एका भांड्यात एक लिटर पाणी घ्या आणि ते २० मिनिटे उकळवा. नंतर त्यात पेरूची पाने टाका. आता हे पाणी थंड होऊ द्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे पाणी साठवून ठेवू शकता. पेरूच्या पाने असलेले पाणी थंड झाल्यावर तळहातावर पूर्णपणे पसरवा आणि केसांच्या मुळांवर चांगले लावा. हे पाणी शॅम्पू करण्यापूर्वी काही तास केसांना लावून राहू द्या.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे केसांना रात्रभर लावून शॉवर कॅप देखील घालू शकता. यानंतर सकाळी केस धुवावेत. पेरूची पाने असलेले हे पाणी केसांना लावल्याने केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि केस पूर्वीपेक्षा अधिक चमकदार आणि निरोगी होतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग