मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Carrot for Hair: केसांवर जादूसारखं काम करते गाजर, अशा प्रकारे लावल्यास दिसेल इन्स्टंट रिझल्ट

Carrot for Hair: केसांवर जादूसारखं काम करते गाजर, अशा प्रकारे लावल्यास दिसेल इन्स्टंट रिझल्ट

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 17, 2023 07:15 PM IST

Hair Care With Carrot: गाजर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण यासोबतच याचे अनेक ब्युटी बेनिफिट्सही आहेत. केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.

केसांवर गाजर वापरण्याची पद्धत
केसांवर गाजर वापरण्याची पद्धत

How to Apply Carrot on Hair: चेहऱ्याप्रमाणेच केसांचीही अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. केसांची काळजी न घेतल्यास ते सहज निर्जीव होऊ शकतात. त्यामुळे केस गळणे, कोरडेपणा अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. याशिवाय केसांचा पोतही बिघडू लागतो. परिणाम केस खूप पातळ होतात. केसांची निगा राखण्यासाठी बाजारात अनेक तेल, शॅम्पू आणि कंडिशनर उपलब्ध आहेत. तसं तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून हेअर केअर रूटीन फॉलो करु शकता. उन्हाळ्यात बाजारात केशरी गाजर मिळतात. हे गाजर आरोग्यासोबतच केसांसाठीही फायदेशीर आहे. ते केसांवर कसे लावायचे ते येथे जाणून घ्या

ट्रेंडिंग न्यूज

Grey Hair: कमी वयात पांढरे झालेले केस काळे करायचे आहेत? फॉलो करा तज्ञांनी सांगितलेल्या सोप्या स्टेप

केसांवर गाजर कसे लावायचे

पहिला मार्ग

या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी गाजर आणि सफरचंद धुवून एका भांड्यात उकळवा. नंतर ते मॅश करा आणि त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. नंतर ही पेस्ट चांगली मिक्स करा. आता हा पॅक स्वच्छ केसांना लावा. हा पॅक किमान ३० ते ४५ मिनिटांसाठी तसाच राहू द्या. नंतर केस धुवा. तेलकट केस असलेल्या लोकांसाठी ही रेमेडी चांगली आहे.

दुसरा मार्ग

या पद्धतीत गाजर आणि केळी व्यवस्थित बारीक करून गुळगुळीत पेस्ट तयार करा. नंतर या पेस्टमध्ये थोडे दही घाला आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. ते चांगले मिक्स करा. नंतर केसांना लावा. कमीत कमी ३० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर केस धुवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग