मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Face Toner: उन्हाळ्यात त्वचेसाठी बेस्ट आहेत हे फेस टोनर, पूर्णपणे स्वच्छ होतील पोर्सेस

Face Toner: उन्हाळ्यात त्वचेसाठी बेस्ट आहेत हे फेस टोनर, पूर्णपणे स्वच्छ होतील पोर्सेस

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 27, 2023 10:24 AM IST

Summer Skin Care Tips: स्किन केअर रूटीनमध्ये फेस टोनर आवश्यक आहे. हे चेहरा डील क्लीन करण्यास मदत करते, तसेच त्वचेचे छिद्र पूर्णपणे स्वच्छ करते. कोणता टोनर सर्वोत्तम आहे ते जाणून घ्या.

फेस टोनर
फेस टोनर

Best Face Toner For Skin: त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य स्किन केअर रूटीन फॉलो करणे आवश्यक आहे. फेस वॉश व्यतिरिक्त टोनर आणि सिरम देखील त्वचेच्या काळजीसाठी आवश्यक आहे. स्वच्छ चमकदार त्वचेसाठी या तीन गोष्टी लावणे आवश्यक आहे. फेस टोनर कोणता वापरावा याबाबत अनेक लोक कंफ्यूज असतात. अशा परिस्थितीत तुमचा संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वोत्तम फेस टोनर सांगत आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

ग्रीन टी

ग्रीन टीच्या पानांमध्ये अँटी ऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर स्प्रे केले जाते तेव्हा ते त्वचेतील आर्द्रता लॉक करतात. याशिवाय अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत होते. ते तयार करण्यासाठी बॉयलरमध्ये २ टी बॅग ठेवा. एक कप पाणी घालून मध्यम आचेवर उकळा. थोडा वेळ उकळल्यानंतर गॅस बंद करून थंड होऊ द्या. हा चहा एका बाटलीत घाला आणि नंतर चेहरा स्वच्छ केल्यानंतर हे टोनर लावा.

ग्लिसरीन

ग्लिसरीन त्वचेला उत्तम प्रकारे आर्द्रता देते आणि ती त्वचा ओलसर, कोमल आणि मऊ बनवते. ते लावण्यासाठी १ कप पाणी घ्या, त्यात १ चमचा ग्लिसरीन आणि २-३ थेंब लिंबाचा रस घाला. चांगले मिक्स करा आणि मिश्रण एका बॉटलमध्ये भरा. चांगले मिसळल्यानंतर वापरा.

काकडी

काकडीचे पाणी तुमच्या त्वचेसाठी अत्यंत हायड्रेटिंग आहे. काकडी त्वचेची चमक परत आणण्यासाठी आणि यूव्ही किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी फायदेशीर आहे. ते वापरण्यासाठी, काकडीचे बारीक तुकडे करा. नंतर ते मिक्सरमध्ये ब्लेंड करा. त्यात १ कप पाणी आणि एक चमचा एलोवेरा जेल घाला. तयार झालेले मिश्रण एका बॉटलमध्ये घाला आणि वापरा. हे टोनर फ्रीजमध्ये ठेवा.

तांदळाचे पाणी

निस्तेज, थकलेल्या त्वचेसाठी तांदळाचे पाणी उत्तम आहे. तसेच तुमचा रंग सुधारण्यास मदत होते. ते बनवण्यासाठी एका भांड्यात १ कप तांदूळ पाण्यासोबत ठेवा. ते चांगले मिक्स करा, पाणी फेसाळ होईपर्यंत ते ढवळत रहा. नंतर पाणी गाळून बाटलीत ठेवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel