मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Baking Soda on Skin: त्वचेवर कधीच अशा प्रकारे वापरू नका बेकिंग सोडा, होईल नुकसान

Baking Soda on Skin: त्वचेवर कधीच अशा प्रकारे वापरू नका बेकिंग सोडा, होईल नुकसान

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 23, 2023 05:17 PM IST

Skin Care Mistakes: त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. यात अनेक वेळा बेकिंग सोडा वापरले जाते. पण त्वचेवर बेकिंग सोडा वापरताना बऱ्याच गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्या पद्धतीने बेकिंग सोडा वापरू नये, याबद्दल जाणून घेऊया.

त्वचेवर बेकिंग सोडा वापरण्याची पद्धत
त्वचेवर बेकिंग सोडा वापरण्याची पद्धत

Baking Soda Skin Care Mistakes: स्किन केअर मध्ये आपण बऱ्याच होम रेमेडी ट्राय करत असतो. पण एखादी गोष्ट करण्याची पद्धत चुकली, किंवा काही कमी जास्त झालं तर त्याचा चांगला परिणाम तर दूर साईट इफेक्ट लगेच होतात. ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी बेकिंग सोडाचा वापर केला जातो. बेकिंग सोडाचे फायदे आणि स्किनकेअरशी जुळलेले अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.

ट्रेंडिंग न्यूज

बेकिंग सोडामध्ये अल्काइन सब्सटेन्स मध्ये अॅन्टी फंगल, अॅन्टीसेप्टिक आणि अॅन्टी इंफ्लेमेटरी गुण असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जातात. पण जर काही बेसिक गोष्टींची काळजी घेतली नाही तर बेकिंग सोडा तुमची स्किन बर्न करण्यासोबतच अनेक स्किन प्रॉब्लेम पण वाढवू शकते. या पाच प्रकारे तुम्ही चुकूनही स्किनवर बेकिंग सोडा वापरू नका. कोणते ते वाचा.

स्क्रबसारखे डायरेक्ट चेहऱ्याला लावू नका

बरेच लोक बेकिंग सोडा एखाद्या क्रीम किंवा स्क्रबसारखे घेऊन डायरेक्ट चेहऱ्याला लावतात. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावार रॅशेस येऊ शकतात. या रॅशेसमुळे पिंपल्सचा धोका वाढू शकतो.

लिंबू सोबत लावणे

बेकिंग सोडामध्ये लिंबूचा रस मिक्स करून चेहऱ्याला लावल्याने तुम्हाला इन्स्टंट ग्लो मिळू शकतो, पण हळू हळू तुमची स्किन डॅमेज होऊ लागते. लिंबू आणि बेकिंग सोडा एकत्र वापरण्याची चूक करू नका. जर तुमची स्किन सेन्सेटिव्ह असेल तर यापासून दूरच रहा.

बेकिंग सोडा आणि कॉफी

बेकिंग सोडा आणि कॉफी एकत्र करून कधीच चेहऱ्याला लावू नका. याने चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. तसेच यामुळे तुमची स्किन बर्न देखील होऊ शकते.

बेकिंग सोडामध्ये गरम तेल

डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी बरेच लोक बेकिंग सोडामध्ये गरम तेल टाकून त्याने समाज करतात. पण हे खूप चुकीचे आहे. तेल मध्ये बेकिंग सोडा अॅक्टिव्हेट होते, जे स्किनसाठी नुकसानकारक आहे.

बेकिंग सोडा टोनर

बेकिंग सोडापासून बनवलेल्या टोनरने तुमची स्किन ड्राय होते. रोज बेकिंग सोडा टोनर लावणे म्हणजे स्किन प्रॉब्लेम वाढवण्याचे काम आहे. असे चुकूनही करू नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग