मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Papaya Face Pack: चेहऱ्यावर अशा प्रकारे पपई लावल्याने बदलेले त्वचेचा रंग, लगेच येईल चमक

Papaya Face Pack: चेहऱ्यावर अशा प्रकारे पपई लावल्याने बदलेले त्वचेचा रंग, लगेच येईल चमक

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 24, 2023 12:57 PM IST

Skin Care With Papaya: पपई सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उत्तम आहे. हे कोलेजनचे उत्पादन देखील वाढवू शकते, ज्यामुळे त्वचा लवचिक बनते. ते वापरण्याचे सोपे मार्ग येथे पहा-

पपईचे फेस पॅक
पपईचे फेस पॅक

Papaya Face Pack to Lighten Skin Tone: पपई त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, जे त्वचेला हायड्रेशन आणि ग्लो प्रदान करण्यास मदत करते. त्याचे सॅलड खाल्ल्यानंतरही त्वचेला चांगला फायदा होतो. मात्र चेहऱ्यावर वापरण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करू शकता. चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी पपईचा वापर कसा करावा ते येथे पाहा-

ट्रेंडिंग न्यूज

१. पपई आणि संत्री

संत्री आणि पपईमध्ये व्हिटॅमिन सी असते. या दोन गोष्टी एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या टोनमध्ये फरक दिसून येतो. यासाठी तुम्हाला फक्त पपई आणि संत्र्याची गरज आहे. त्याचा पॅक बनवण्यासाठी पपईचे छोटे तुकडे करा आणि नंतर त्यात संत्र्याचा रस घाला. चांगले मिसळा आणि नंतर चेहऱ्यावर लावा. हा पॅक १५ मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा. हा पॅक आठवड्यातून दोनदा लावता येतो.

२. पपई आणि हळद

हळदीमध्ये अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यासोबतच यामध्ये भरपूर अँटी ऑक्सीडेंट असते. त्वचेच्या समस्यांना तोंड देण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी पपई आणि हळद लागेल. ते बनवण्यासाठी पपई मॅश करा आणि नंतर त्यात चिमूटभर हळद घाला. चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने धुवा.

३. पपई आणि दूध

दूध त्वचेला एक्सफोलिएट करते आणि चेहरा स्वच्छ करते. ते बनवण्यासाठी पपई मॅश करा आणि नंतर त्यात दूध घाला. ही पेस्ट चेहर्‍यावर चांगली लावा. १५-२० मिनिटांनी सुकल्यानंतर पूर्णपणे स्वच्छ करा. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून २-३ वेळा ते लावा.

४. पपई आणि मुलतानी माती

चेहरा स्वच्छ करण्यासाठी मुलतानी माती उपयुक्त आहे. यामुळे चेहऱ्यावरील घाण निघून जाते. ते लावण्यासाठी पपई चांगली मॅश करा आणि नंतर त्यात मुलतानी माती घाला. त्यात थोडे गुलाब जल टाकून पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्यावर चांगला लावा आणि वाळल्यानंतर धुवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग